'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी प्रेक्षकांना गिफ्ट ; ‘नको हा बहाणा’ हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला
'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी ‘नको हा बहाणा’ (Nako ha bahaana) गाणं रिलीज होणार आहे.
Nako ha bahaana Song : फेब्रुवारी (February) महिना हा अनेक युवक, युवती प्रेमाचा महिना म्हणून साजरा करतात. एकमेकांना गिफ्ट देण, डेटवर जाणं, समुद्रकिनारी बसून गप्पा मारणे अशा अनेक माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करतात, या महिन्याचे मुख्य आकर्षण असते ते म्हणजे व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) आणि येत्या 14 फेब्रुवारी म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे' चे अजून एक खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे याच दिवशी झी म्युझिक मराठी घेऊन येत आहे.
एक नवीन मराठी म्युझिक अल्बम ‘नको हा बहाणा’ (Nako ha bahaana) या गाण्यामध्ये अभिनेता निखिल चौधरी (Nikhil Choudhary) आणि अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar) यांची गोड जोडी प्रेक्षकांना बघायला मिळेल, या गाण्याचे पोस्टर रिलीज झाले असून सोशल मिडीयावर या गाण्यासाठी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता दिसून येत आहे. गायत्रीनं निखिल आणि तिचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'जिवनात एक क्षण असा यावा.तुझ्या ओठावर हसु आणि माझा जिव जावा.'
View this post on Instagram
निमिषा चौधरी प्रस्तुत, सौरभ चौघुले दिग्दर्शित ‘नको हा बहाणा’ या गाण्याला देव अहिरराव यांनी गायले असून, या गाण्याचे संगीतही त्यांचेच आहे. संकेत जाधव यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. तर राहुल दास यांनी या गाण्याचे छायाचित्रण केले आहे.
हेही वाचा :
- Yami Gautam : 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट, यामी गौतमचा अनोखा अंदाज
- Rashmika Mandanna : थिएटरमध्ये बसून रश्मिका मंदान्ना शिट्टी वाजवते तेव्हा...
- कौतुकास्पद! सोनू सूदनं अपघातात जखमी झालेल्या तरूणाची केली मदत, मोठा अनर्थ टळला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha