Rashmika Mandanna : थिएटरमध्ये बसून रश्मिका मंदान्ना शिट्टी वाजवते तेव्हा...
Rashmika Mandanna : पुष्पाच्या यशानंतर रश्मिका चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आहे. रश्मिकाचा एक किस्सा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रश्मिका थिएटरमध्ये बसून शिट्ट्या वाजवत असते. तिने स्वत:च याबाबत माहिती दिली आहे.
Rashmika Mandanna : पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिची फॅन फॉलोईंग चांगलीच आहे. तिचे बोलके डोळे आणि तिची स्माईल आणि तिचं एकंदरीत सौंदर्य चाहत्यांना घायाळ करून टाकतं. पुष्पाच्या यशानंतर रश्मिका चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आहे. रश्मिकाशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतुर असतात. रश्मिकाचे मनमोहक परफॉर्मन्स प्रेक्षकांना खूपच भावतात. तिचे सुंदर फोटो पाहून चाहते तिच्या बालिशपणाचे आणि सौंदर्याचे तोंडभरू कौतुक करत असतात. रश्मिकाचा असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रश्मिका थिएटरमध्ये बसून शिट्ट्या वाजवत असते. तिने स्वत:च याबाबत माहिती दिली आहे.
रश्मिका मंदान्नाने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामध्ये तिने हा किस्सा शेअर केला आहे. यासोबतच तिने या संपूर्ण प्रकाराशी संबंधित चाहत्यांच्या प्रतिक्रीयाही शेअर केल्या आहेत. मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाचं उत्तर देताना रश्मिका म्हणाली की, चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेल्यानंतर मी हुल्लडबाजी करणे थांबवत नाही. माझ्या चित्रपटासाठी नाही, पण मला एखादा चित्रपट आवडला तर मी शिट्टी वाजवते. एवढंच नाही तर थिएटरमध्येच डान्ससुद्धा करते. परंतु, त्यावेळी जर कोणी मला ओळखलं तर मला वाटतं आता येथून निघून जावं.
रश्मिका तिच्या या बालिशपणाबाबत सांगत असताना तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते. रश्मिकाच्या या क्युट स्टाईलवर चाहते जीव ओवाळून टाकतात. तिचा गोंडस लूक लोकांना वेड लावायला पुरेसा आहे, असे चाहते म्हणतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाने रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता खूपच वाढवली आहे. आधी रश्मिकाचा डंका फक्त दक्षिणेतच होता, तो आता बॉलिवूडमध्येही वाजत आहे.
महत्वाच्या बातम्या
- in Pics : दिशा पटानीपासून रश्मिका मंदान्नापर्यंत या सौंदर्यवतींना लोकांनी दिली 'नॅशनल क्रश'ची पदवी
- Rashmika Mandanna : रणवीर सिंगच्या ‘या’ चित्रपटाची फॅन झालीये रश्मिका, पाहा काय म्हणाली नॅशनल क्रश...
- दोनवेळा मृत्यूला परतवलं, त्सुनामीत गमावले जवळचे मित्र, प्रीती झिंटाच्या आयुष्यातल्या ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
- Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' म्हणत स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन!