एक्स्प्लोर

पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना

जिल्ह्याच्या जुन्नर वनविभागाच्या हद्दीत मानव-बिबट संघर्षाच्या घटनांमध्ये मागील काही वर्षांत मोठी वाढ झाल्याने पकडण्यात आलेल्या बिबट्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पुणे: जिल्ह्यातील वाढती बिबट्यांची (Leopard) संख्या मनुष्यवस्तीसाठी जीवेघेणी ठरत असल्याचं चित्र गेल्या काही महिन्यात दिसून आलं. त्यामुळे, शासनापुढे पुणे जिल्ह्यातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येचा आणि माणसांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच अनुषंगाने पुण्यातील बिबट्यांना गुजरातमधील वनतारा येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून राज्य सरकार आणि वनतार यांच्यात करारही झाला होता. त्यानुसार, आता येथील 50 बिबट्यांना वनतारामध्ये हलविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार, जुन्नर (pune) तालुक्यातील माणिकडोह येथून 20 बिबटे गुजरातमधील वनतारा (Vantara) येथे हलविण्यात आले आहेत. 

जिल्ह्याच्या जुन्नर वनविभागाच्या हद्दीत मानव-बिबट संघर्षाच्या घटनांमध्ये मागील काही वर्षांत मोठी वाढ झाल्याने पकडण्यात आलेल्या बिबट्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आज (7 मार्च) रोजी पहिल्या टप्प्यात 20 बिबट्यांना गुजरातमधील वनतारा केंद्रात हलविण्यात आले. मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर व शिरूर तालुक्यातील काही बिबट्यांना पकडून त्यांना माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे ठेवण्यात आले होते. मात्र, या केंद्राची क्षमता 50 इतकी मर्यादित असल्याने अतिरिक्त बिबट्यांचे इतर योग्य ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक झाले होते. 

पहिल्या टप्प्यात 20 बिबटे दाखल

बिबट्यांच्या स्थलांतरणासाठीचा प्रस्ताव Central Zoo Authority, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला 20 डिसेंबर 2025 रोजी मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानुसार गुजरातमधील Greens Zoological Rescue and Rehabilitation Center (Vantara) येथील 25 सदस्यीय पथक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली 6 मार्च रोजी जुन्नर येथे दाखल झाले. आज पहिल्या टप्प्यात 10 नर आणि 10 मादी अशा एकूण 20 बिबट्यांना वातानुकूलित आणि सुसज्ज रेस्क्यू व्हॅनद्वारे सुरक्षितपणे वनतारा केंद्रात रवाना करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जुन्नर वनविभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच वाइल्डलाइफ SOS संस्थेच्या सहकार्याने पार पडली. 

दरम्यान मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Bypoll : माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईचा नामवंत वकील पाठवला होता, करुणा शर्मांचा आरोप
Baramati Bypoll : माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईचा नामवंत वकील पाठवला होता, करुणा शर्मांचा आरोप
Baramati Byelection: बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना बोगस आणि निकृष्ट खते, शेतकऱ्यांना मोठा फटका, औषध कंपन्यांनवर गुन्हा दाखल करण्याची राजू शेट्टींची मागणी
कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना बोगस आणि निकृष्ट खते, शेतकऱ्यांना मोठा फटका, औषध कंपन्यांनवर गुन्हा दाखल करण्याची राजू शेट्टींची मागणी
Harshwardhan Sapkal On Baramati By Election 2026: बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; सपकाळांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून किती जहाजांचं मार्गक्रमण? धक्कादायक आकडेवारी समोर
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाईल काढला अन् गिफ्ट दिला
Embed widget