एक्स्प्लोर

चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत

दक्षिण भारतातील काही राज्यांत जन्मदर सातत्याने घटत असल्याचं आकडेवारीवरुन समोर येत आहे.

हैदराबाद: जगातील सर्वात मोठी लोकसंख्या (Population) असलेला देश म्हणून भारताने चीनला मागे टाकत पहिलं स्थान पटकावले आहे. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात नेहमीच मुले जन्माला घालण्यावरुन चर्चा होत असते. कुणी हिंदूंनी 10 मुले जन्माला घातली पाहिजे, असे म्हणतो, तर कुणी 4 मुले (Born) जन्माला घालण्याचा सल्ला देतो. विशेष म्हणजे भारत सरकारने हम दो-हमारे दो म्हणत दोन मुलांच्या जन्मासाठीच आग्रह धरला आहे. मात्र, आता आंध्र प्रदेश सरकारकडून तिसऱ्या मुलाच्या जन्माचे स्वागत केले जाणार आहे. राज्यातील जन्मदर घटत असल्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu naidu) यांनी थेट विधानसभेतच याबाबतची घोषणा केली. राज्य सरकारने लोकसंख्येसंदर्भात नवी नीती आखत असून दुसऱ्या आणि तिसऱ्या अपत्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. 

दक्षिण भारतातील काही राज्यांत जन्मदर सातत्याने घटत असल्याचं आकडेवारीवरुन समोर येत आहे. त्यामुळेच, काही राज्य सरकारने लोकसंख्या कमी करण्याऐवजी संतुलन कायम ठेवण्यासाठी योजना आखत आहे. त्यानुसार, आंध्र प्रदेश सरकार तिसऱ्या अपत्यास 25,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार असल्याची माहिती आहे. 

25 हजारांची प्रोत्साहन मदत

आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू यांच्या प्रस्तावित नव्या लोकसंख्या नितीनुसार, दुसरे किंवा तिसरे अपत्य जन्मलेल्या पालकांना 25000 रुपये प्रोत्साहन निधी दिला जाईल. तसेच, तिसऱ्या अपत्यासाठी विशेष सुविधा देण्याचीही संकल्पना आहे. त्यानुसार, तिसऱ्या मुलास वयाच्या 5 वर्षांपर्यंत दरमहा 1000 रुपये, वयाच्या 18 वर्षांपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे. या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाल्यास अधिक मुलांसाठी दाम्पत्य विचार करतील, असे सरकारला वाटते. विशेष म्हणजे, मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सरकारची नवी लोकसंख्या नीती निश्चित केली जाईल. त्यानंतर, 1 एप्रिल पासून नवी लोकसंख्या निती योजना सुरू होऊ शकते. 

महिलांनाही विशेष सवलती देणार

भविष्यात राज्यातील लोकसंख्या संतुलन कायम ठेवण्यास आणि लोकसंख्या जन्मदराची घट कमी करण्यात शासनाची ही योजना महत्त्वाची ठरेल. या योजनेसह महिलांनाही विशेष सवलत देण्यात येणार आहे. सरकार मातृत्व सेंटर ऑफ एक्सीलेंस स्थापन करणार आहे, जेथे आधुनिक आरोग्य सुविधा आणि आयवीएफ (IVF) सारख्या सेवा दिल्या जातील. यांसह प्रत्येक 50 मुलांसाठी एक चाइल्ड केअर सेंटरही उभारण्यात येईल. महिलांच्या सुविधांसाठी पिंक टॉयलेट बनविण्यात येईल. तर, कर्मचारी महिलांसाठी विशाखापट्टनम येथे 172 कोटींची खर्च करुन मोठं हॉस्टेल उभारण्यात येणार आहे.  तसेच, सिजेरियन डिलीवरी कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

हेही वाचा

शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अतानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Right To Vote : मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Dosa Batter Crime news: आम्ही नवस फेडायला येऊ! डायरीत लिहलेल्या 'त्या' एका ओळीने पोलिसांची ट्युब पेटली; मुलींच्या डोसा पीठ मृत्यूप्रकरणात ट्विस्ट
आम्ही नवस फेडायला येऊ! डायरीत लिहलेल्या 'त्या' एका ओळीने पोलिसांची ट्युब पेटली; मुलींच्या डोसा पीठ मृत्यूप्रकरणात ट्विस्ट
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
America Iran Islamabad Talks: इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
Embed widget