एक्स्प्लोर

ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष

राष्ट्रपती राज्यात आल्यानंतरही त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बनर्जी किंवा त्यांच्या सरकारकडून कोणीही मंत्री आला नसल्याची खंत राष्ट्रपती मुर्मू यांनी बोलून दाखवली.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta bannerji) आणि केंद्रातील मोदी सरकारमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu) यांच्या दार्जिलिंग दौऱ्यात ममता बॅनर्जी यांच्याकडून राष्ट्रपतींचा अवमान करण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) म्हटलं आहे. राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागताला मुख्यमंत्री आल्या नाहीत. याशिवाय येथील आंतरराष्ट्रीय संताल सम्मेलनाच्या जागेवरूनही वाद झाल्याचं पाहायला मिळालं. या संमेलानासाठी आलेल्या राष्ट्रपतींनी थेट जाहीर भाषणात आपली नाराजी बोलून दाखवली. हा कार्यक्रम अशा ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे, जिथे संताल समाजाचे लोक सहज पोहचू शकणार नाहीत, अशी नाराजी राष्ट्रपतींनी बोलून दाखवली. 

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथ आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रपती राज्यात आल्यानंतरही त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बनर्जी किंवा त्यांच्या सरकारकडून कोणीही मंत्री आला नसल्याची खंत राष्ट्रपती मुर्मू यांनी बोलून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत खंत आणि नाराजी व्यक्त केली आहे. 

मोदींकडून ट्विट करत संताप व्यक्त

लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या तसेच आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणावर श्रद्धा असलेल्या सर्व नागरिकांसाठी ही घटना लज्जास्पद आणि अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली. आदिवासी समाजातून आलेल्या राष्ट्रपतींनी स्वतः व्यक्त केलेल्या वेदना आणि संतापामुळे देशातील जनतेच्या मनात मोठी खंत असून दुःख झालं आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या, राष्ट्रपतींचा झालेला हा अपमान राज्यातील प्रशासनामुळेच घडल्याचे मोदींनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. संताल संस्कृतीसारख्या महत्त्वाच्या विषयाकडे पश्चिम बंगाल सरकारने अत्यंत हलगर्जीपणे पाहिले. राष्ट्रपती हे पद राजकारणापलिकडचे असून त्या पदाची प्रतिष्ठा आणि पावित्र्य कायम राखले गेले पाहिजे. पश्चिम बंगाल सरकार आणि तृणमूल काँग्रेसला यापुढे तरी सुबुद्धी येईल, अशा संतप्त आणि उपरोधात्मक भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या आहेत. 

राष्ट्रपतींचीही नाराजी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही दार्जिलिंगमधील कार्यक्रमात थेट नाराजी व्यक्त केली. ममता बॅनर्जी माझ्या लहान बहिणीसारख्या आहेत, मी देखील प. बंगालची कन्या आहे. त्या नाराज आहेत की नाही हे मला माहिती नाही. पण, त्याने काही फरक पडत नाही. संताल समाजासाठीचा आजचा कार्यक्रम बिधाननगर येथून गोशाईपुरला स्थलांतरीत का करण्यात आला. येथे लोकांची उपस्थिती कमी दिसली. मात्र, हा कार्यक्रम बिधाननगरमध्ये झाला असता, तर जास्त संख्येने समाजबांधव आले असते, अशी खंत मुर्मू यांनी बोलून दाखवली.

 

हेही वाचा

130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dosa Batter Crime news: आम्ही नवस फेडायला येऊ! डायरीत लिहलेल्या 'त्या' एका ओळीने पोलिसांची ट्युब पेटली; मुलींच्या डोसा पीठ मृत्यूप्रकरणात ट्विस्ट
आम्ही नवस फेडायला येऊ! डायरीत लिहलेल्या 'त्या' एका ओळीने पोलिसांची ट्युब पेटली; मुलींच्या डोसा पीठ मृत्यूप्रकरणात ट्विस्ट
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
America Iran Islamabad Talks: इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
Uddhav Thackeray Shivsena: एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे अन् ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं, नेमकं काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Embed widget