एक्स्प्लोर

Kantara Bappa Avatar : गणेशोत्सवात 'कांतारा' फिवर, पंजुर्ली दैवाच्या रुपात अवतरले बाप्पा; VIDEO एकदा पाहाच

Kantara Fame Ganpati Bappa : यंदा गणेशोत्सावावर कांतारा फिवर पाहायला मिळत आहे. एका गणेशोत्सव मंडळाने भुता कोला-थीमची बाप्पाची मूर्ती बनवली आहे.

Kantara Ganesh Idol : गणेश चतुर्थी 2024 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. गणेशभक्त बाप्पाच्या आमगनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गणेशभक्त लाडक्या बाप्पाचे भक्तिभावाने स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबई गणेशोत्सव अत्यंत भव्य पद्धतीने साजरा केला जातो. मुंबईतील रस्त्यांवर विविध मंडळे, आकर्षक देखावे करतात. यावेळी विविध आकार, थीमच्या गणेशमूर्ती पाहायला मिळतात. यंदाही गणेशोत्सावावर कांतारा फिवर पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवात 'कांतारा' फिवर

2022 मध्ये रिलीज झालेल्या 'कांतारा' चित्रपटाला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. या चिपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रिषभ शेट्टीचा दमदार अभिनय आणि दिग्दर्शनामुळे या चित्रपटाला यंदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल. 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'कांतारा' चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट मनोरंजन प्रदान करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट' पुरस्कार मिळाला. 'कांतारा' चित्रपटाबद्दलचा उत्साह अजूनही कायम आहे. याची झलक गणेशोत्सवातचही पाहायला मिळत आहे.

पंजुली दैवाच्या रुपात अवतरले गणपती बाप्पा

ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटाला अलिकडे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 याने गौरवण्यात आलं आहे. यानंतर देशभरातील चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा कांतारा फिवर दिसत आहे. कांतारा चित्रपटापासून प्रेरणा घेत एका मंडळाने भुता कोला-थीमची बाप्पाची मूर्ती बनवली आहे. नवी मुंबईतील एका गणेश मंडळाने 'कांतारा' फेम पंजुर्ली दैवाच्या भूता-कोला रुपातील मूर्ती बनवली आहे. 'कोपरखैरणेचा एकदंत' या मंडळाची ही आकर्षक मूर्ती आहे. या मूर्तीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.फक्त यंदाच नाही तर गेल्या वर्षी 2023 मध्येही गणेशोत्सवात कांतारा चित्रपटाचा ट्रेंड दिसून आला होता.

'कांतारा' गणेशमूर्तीचं धूमधडाक्यात स्वागत

नवी मुंबईतील कौपरखैरणे येथील गणेशोत्सव मंडळाने यंदा 'कांतारा' गणेशमूर्तीचं स्वागत केलं आहे. पांजुर्ली दैवावर आधारित या गणेशमूर्तींची थीम आणि सजावट करण्यात आली आहे. कांतारा चित्रपट रिलीज झाल्यापासून चाहत्यांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांवर याचा प्रभावही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने भारतातील छोट्याशा गावातील कथा आणि प्रथा जगासमोर आणली आहे. कांतारा चित्रपटामुळे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीची जागतिक पातळीवर ओळख झाली आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

View this post on Instagram
 
A post shared by Vinayak Pagare (@vinayakpagareartwork)

कांतारा 2 चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरता

कांतारा चित्रपटाने कन्नड चित्रपटसृष्टीसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आता प्रेक्षक कांतारा 2 चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कांतारा चित्रपटाचा दुसरा भाग हा मूळ चित्रपटाचा प्रीक्वेल असणार आहे. या चित्रपटाचं शूटींग पूर्ण झालं असून चित्रपट पोस्ट प्रोडक्शनमध्ये आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan : मोठी बातमी! सलमान खान यंदा BIGG BOSS शो होस्ट करणार नाही? 'या' कारणामुळे शोपासून दूर राहण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मोठी बातमी : रवींद्र धंगेकरांनंतर आणखी एक माजी आमदार शिवसेनेत, एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार!
मोठी बातमी : रवींद्र धंगेकरांनंतर आणखी एक माजी आमदार शिवसेनेत, एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार!
Buldhana Crime News: प्रख्यात डॉक्टरचे महिलेशी अश्लील चाळे;व्हिडिओ व्हायरल होताच डॉक्टर फरार, बुलढाण्यात एकच खळबळ
प्रख्यात डॉक्टरचे महिलेशी अश्लील चाळे;व्हिडिओ व्हायरल होताच डॉक्टर फरार, बुलढाण्यात एकच खळबळ
प्रशांत कोरटकर धमकी प्रकरण : राज्य सरकारची बाजू ऐकून प्रकरणावर योग्य तो निर्णय द्या, हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश
प्रशांत कोरटकर धमकी प्रकरण : राज्य सरकारची बाजू ऐकून प्रकरणावर योग्य तो निर्णय द्या, हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश
Abu Azmi : औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्या अबू आझमींची छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त खास पोस्ट; म्हणाले...
औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्या अबू आझमींची छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त खास पोस्ट; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार : भास्कर जाधवRavindra Dhangekar : वक्फ बोर्डाच्या जमीन खरेदीचं प्रकरण हे  माझ्याविरोधातलं षडयंत्र-धंगेकरContract Cleaner Mahapalika : 580 कंत्राटी सफाई कामगार मुंबई महापालिकेत कायम9 Sec Superfast News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : मोठी बातमी : रवींद्र धंगेकरांनंतर आणखी एक माजी आमदार शिवसेनेत, एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार!
मोठी बातमी : रवींद्र धंगेकरांनंतर आणखी एक माजी आमदार शिवसेनेत, एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार!
Buldhana Crime News: प्रख्यात डॉक्टरचे महिलेशी अश्लील चाळे;व्हिडिओ व्हायरल होताच डॉक्टर फरार, बुलढाण्यात एकच खळबळ
प्रख्यात डॉक्टरचे महिलेशी अश्लील चाळे;व्हिडिओ व्हायरल होताच डॉक्टर फरार, बुलढाण्यात एकच खळबळ
प्रशांत कोरटकर धमकी प्रकरण : राज्य सरकारची बाजू ऐकून प्रकरणावर योग्य तो निर्णय द्या, हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश
प्रशांत कोरटकर धमकी प्रकरण : राज्य सरकारची बाजू ऐकून प्रकरणावर योग्य तो निर्णय द्या, हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश
Abu Azmi : औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्या अबू आझमींची छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त खास पोस्ट; म्हणाले...
औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्या अबू आझमींची छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त खास पोस्ट; म्हणाले...
KK Wagan Pakistan ambassador to Turkmenistan : पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बेईज्जती सुरुच! अमेरिकेत पोहोचलेल्या राजदूतांना विमानतळावरूनच घरी पाठवलं
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बेईज्जती सुरुच! अमेरिकेत पोहोचलेल्या राजदूतांना विमानतळावरूनच घरी पाठवलं
युझवेंद्र चहलसोबत दिसलेली आरजे माहवश नेमकी कोण आहे?
युझवेंद्र चहलसोबत दिसलेली आरजे माहवश नेमकी कोण आहे?
Sanjay Raut on Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर बायकोमुळे काँग्रेस सोडून शिंदे गटात का गेले? संजय राऊतांचा सनसनाटी दावा
रवींद्र धंगेकर बायकोमुळे काँग्रेस सोडून शिंदे गटात का गेले? संजय राऊतांचा सनसनाटी दावा
Satish Bhosale aka Khokya Bhai: सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, पोलिसांना शरण येण्यापूर्वी कायदेशीर फिल्डिंग, वकील म्हणाले...
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या वकिलांनी कायद्याचा कीस पाडला, बिनतोड युक्तिवाद, म्हणाले...
Embed widget