Eknath Shinde : मोठी बातमी : रवींद्र धंगेकरांनंतर आणखी एक माजी आमदार शिवसेनेत, एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार!
Eknath Shinde : रवींद्र धंगेकर यांच्यानंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार असल्याचे दिसून येते.

Eknath Shinde : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravidra Dhangekar) यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता काँग्रेसला आणखी एका मोठा धक्का बसणार आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर (Bhau Patil Goregaonkar) हे काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. तर महायुतीला मोठा फटका बसला होता. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने एकहाती सत्ता स्थापन केली. तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यानंतर आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एका मागे एक धक्के बसत आहेत. महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी सत्तेत असलेल्या महायुतीत सहभागी होत आहेत. आता हिंगोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचे दिसून येते.
भाऊ पाटील गोरेगावकर धनुष्यबाण हाती घेणार
हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर हे आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. भाऊ पाटील गोरेगावकर यांनी तब्बल तीन वेळेस हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाऊ पाटील गोरेगावकर काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु, त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी भरत निवडणूक लढली होती.
एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार
या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता भाऊ पाटील गोरेगावकर हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले असून लवकरच त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या प्रवेशाच्या निमित्ताने भाऊ पाटील गोरेगावकर यांनी एकनाथ शिंदे यांची यापूर्वीच भेट घेतली असून एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगोलीमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करत भाऊ पाटील गोरेगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे समजते. पुण्याच्या रवींद्र धंगेकरांनंतर हिंगोलीचे भाऊ पाटील गोरेगावकर शिंदे गटात दाखल होणार असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार असल्याचे दिसून येते.
आणखी वाचा























