
Entertainment News Live Updates 29 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत उत्कर्ष शिंदे साकारणार संत चोखामेळा
Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माउली' (Dnyaneshwar Mauli) या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केलं आहे. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावल्या आहेत. आता या मालिकेत उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) संत चोखामेळांच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
Ketaki Chitale : केतकी चितळेचं फेसबुकवर कमबॅक
Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यामुळे केतकीला तुरुंगवास भोगावा लागला होता. तसेच तिला तिच्या फेसबुक अकाऊंटचा वापर करण्यालाही मनाई करण्यात आली होती. पण आता तिला तिचं फेसबुक अकाऊंट परत मिळाले आहे.
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा आज क्वॉरंटाईनचा शेवटचा दिवस
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज क्वॉरंटाईनचा शेवटचा दिवस आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीतदेखील सुधारणा होत आहे. अमिताभ यांनी दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो आऊट झालाय. या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) राग शांत करण्याच्या 101 उपायांविषयी बोलत आहेत.
View this post on Instagram
करीना कपूरनं शेअर केला बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडीओ
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
