एक्स्प्लोर

Australia vs India, 5th Test : इकडं पंतकडून चौफेर धुलाई अन् कॅप्टन जसप्रित बुमराहची सुद्धा बातमी आली! टीम इंडिया पलटवार करणार?

Australia vs India, 5th Test : बुमराहला दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. बुमराहला दुखापतींचा मोठा इतिहास आहे. याआधीही तो दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर होता.

Australia vs India, 5th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटी आता रोमांचक वळणावर पोहोचली असतानाच कॅप्टन जसप्रीत बुमराह जखमी झाला. दुखापतीनंतर त्याने मैदान सोडले आणि विराट कोहलीने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. यानंतर अपडेट आले की बुमराहला स्कॅनसाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, त्याची दुखापत फारशी गंभीर नसून तो पुन्हा एकदा या सामन्यात कर्णधारपदासह वेगवान गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारेल अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे. बुमराह मैदानात परतल्याने भारतीय संघासह चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. बुमराहला दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. बुमराहला दुखापतींचा मोठा इतिहास आहे. याआधीही तो दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर होता.

दुपारच्या जेवणानंतर एकच षटक टाकता आला

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचव्या कसोटीदरम्यान, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात फॉर्ममध्ये असलेला फलंदाज मार्नस लॅबुशेनला बाद केले. त्यानंतर लंचनंतर त्याने फक्त एक षटक टाकले आणि टीम डॉक्टर आणि बीसीसीआयच्या सचोटी व्यवस्थापकासह मैदानाबाहेर गेला. त्यानंतर त्याला स्कॅनिंगसाठी नेण्यात आले. या घटनेने बुमराहला वारंवार दुखापत झाल्याच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.

दुखापतींशी  जुना संबंध

गेल्या काही वर्षांपासून बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दल चिंता निर्माण झाली आहे, ज्याचा त्याच्या कारकिर्दीवर वारंवार परिणाम होत आहे. 2022 च्या आशिया चषकापूर्वी त्याची सुरुवात झाली, ज्यामध्ये पाठीच्या समस्येमुळे बुमराहला बाहेर जावे लागले. त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेदरम्यान त्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या पाठीच्या खालच्या भागात कडकपणामुळे त्याला पुन्हा एकदा बाहेर पडावे लागले. यामुळे त्याला 2022 च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडावे लागले, ज्यामुळे त्याच्या आणि भारतीय संघाच्या आशांना मोठा धक्का बसला.

पंतचा धमाका

दुसरीकडे, दुसऱ्या डावात पंतने आपला 'ऋषभ पंत' दाखवत कांगारूंना खिंडार पाडले. पंतने आक्रमक फलंदाजी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. या मालिकेत पंतच्या शॉट निवडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, पण पंतने आपला नैसर्गिक खेळ केल्यास तो किती धोकादायक ठरू शकतो हे दाखवून दिले.

ऋषभ पंतने दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले

दुसऱ्या डावात ऋषभ पंतने अवघ्या 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे भारताचे कसोटीतील दुसरे सर्वात जलद अर्धशतक होते. ऋषभ पंतनेही पहिल्या चेंडूवर षटकार मारून डावाची सुरुवात केली. त्याचवेळी त्याने पूर्ण षटकार ठोकत आपले अर्धशतकही पूर्ण केले. मात्र, भारतासाठी कसोटीतील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही पंतच्या नावावर आहे. त्याने 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 28 चेंडूत अर्धशतक केले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतोDisha Salian Case : दिशा सालियनची फाईल उघडणार? कोणकोण अडकणार?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Nitesh Rane on Disha Salian Aaditya Thackeray : सत्यमेव जयते! तुम्ही खोटं लपवू शकत नाही : नितेश राणे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget