Entertainment News Live Updates 27 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Bhediya Box Office Collection Day 2: वरुणच्या 'भेडिया' नं बॉक्स ऑफिसवर केला कल्ला; जाणून घ्या कलेक्शन
Bhediya Box Office Collection Day 2: भेडियानं ओपनिंग डेला 7.48 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (26 नोव्हेंबर) या चित्रपटानं 9.57 कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांमध्ये या चित्रपटानं जवळपास 17.05 कोटींची कमाई केली आहे. 60 ते 70 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली.
View this post on Instagram
Ashirwad Tuza Ekveera Aai : मयूरी वाघ एकवीरा आईच्या भूमिकेत
Ashirwad Tuza Ekveera Aai : मालिकाविश्वात सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत उद्यापासून 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' (Ashirwad Tuza Ekveera Aai) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
Katrina Kaif: सेम टू सेम कतरिनाच! नेटकरी झाले अवाक्, म्हणाले, 'सलमान भाई...'.
Katrina Kaif: सेलिब्रिटींच्या डुप्लिकेट्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आलिया भट्ट (Alia Bhatt), शाहरुख खान (Shah Rukh Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), ऐश्वर्या राय या सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. आता अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सारख्या दिसणाऱ्या एका तरुणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील त्या तरुणीचा लूक पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.
View this post on Instagram
Puneet Issar : 'महाभारत' फेम अभिनेता फसवणुकीचा बळी
Puneet Issar : 'महाभारत' (Mahabharat) फेम अभिनेते पुनीत इस्सार (Puneet Issar) सध्या चर्चेत आहे. पुनीत यांचं खातं हॅक करून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. आता या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Seema Sajdeh: 'दारु जास्त झाली का?'; सोहेल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेहला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पाहा व्हिडीओ व्हायरल
Seema Sajdeh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोहेल खानची (Sohail Khan) एक्स वाइफ सीमा सजदेह (Seema Sajdeh) ही द फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलीवूड वाइफ (Fabulous Lives of Bollywood Wives) या शोमुळे चर्चेत होती. सीमा ही फॅशन डिझाइनर आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं (Karan Johar) 25 नोव्हेंबर रोजी एका पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये सीमानं हजेरी लावली होती. पार्टीसाठी सीमानं खास लूक केला होता. या पार्टीनंतर सीमानं पॅपराझीसाठी पोज दिली. पोज देत असतानाच सीमाचा तोल डगमगला. त्यामुळे सध्या काही नेटकरी सीमाला ट्रोल करत आहेत.
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
