एक्स्प्लोर

Anna Bansode: दोन दिवसांपूर्वी विधानसभा उपाध्यक्ष झालेल्या अण्णा बनसोडेंची आमदारकी धोक्यात? काय आहे कारण?

Anna Bansode: पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. अण्णा बनसोडे यांना 2 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी दोन दिवसांपुर्वीच बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. अण्णा बनसोडे यांना 2 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

आमदार अण्णा बनसोडे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत-धर यांनी अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. बनसोडे यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा सुलक्षणा शीलवंत-धर यांनी याचिकेतून आरोप केला आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली आहे. 

अण्णा बनसोडे तब्बल तीन वेळा पिंपरीचे आमदार

अण्णा बनसोडे हे तब्बल तीन वेळा पिंपरीचे आमदार झाले आहे. ही त्यांची तिसरी टर्म आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून अण्णा बनसोडे यांची ओळख आहे. तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, जादा इच्छूक आणि मंत्रिपदे कमी यामुळे महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदं मिळालं नाही. मात्र, अजित पवारांनी त्यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदी संधी दिली आहे. याशिवाय विविध समित्यांवर त्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे अण्णांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजन वाढल्याचे चित्र आहे.

कोण आहेत अण्णा बनसोडे?

अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांची राजकीय कारकिर्द 1997 पासून पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक म्हणून सुरुवात झाली. ते 2002 पर्यंत नगरसेवक पदी होते. पिंपरी चिंचवड महापलिकेत स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केले आहे. पुढे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. मोदी लाटेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे गौतम चाबूकस्वार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. मात्र, 2019 आणि 2024 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा आपली ताकद लावली. तिसऱ्यांदा निवडून आले. पिंपरी चिंचवडचे नगरसेवक ते विधानसभेचे उपाध्यक्ष या अण्णा बनसोडे यांच्या वाटचालीत अजित पवार (Ajit Pawar) यांचे योगदान मोठे आहे. दादांच्या पाठिंब्यामुळेच बनसोडे हे उपाध्यक्षपदापर्यंत पोचले आहेत. अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Speech Beed : परळीची जनता इतिहास घडवणार;पंकजा मुंडेंचं बीडमध्ये तुफान भाषण
Mahapalikecha Mahasangram Uran : उर भागात लोकसंख्या वाढ मात्र सुविधा अपुऱ्या, काय म्हणाले नागरिक?
Dhananjay Munde and Walmik Karad: भाषण सुरु असताना धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण?
Raosaheb Danve & Babanrao Lonikar : 40 वर्ष एकाच पक्षात, पण 12 वर्षे अबोला,  दानवे-लोणीकर एकत्र
Aaditya Thackeray PC : फक्त याद्यांमध्ये गोंधळ नाही तर अनेक ठिकाणी घोळ, आदित्य ठाकरेंचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Embed widget