Entertainment News Live Updates 02 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
Ashok Rane : सिने-समीक्षक अशोक राणे यांना यंदाचा 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' जाहीर
Satyajit Ray Memorical Awards Winner Ashok Rane : सिने-समीक्षक अशोक राणे (Ashok Rane) यांना यंदाचा 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' (Satyajit Ray Memorical Awards 2023) जाहीर झाला आहे. सिनेसृष्टीतील लेखनासाठी तसेच चित्रपट समीक्षा लेखन क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल अशोक राणे यांना 'सत्यजित रे स्मृती पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येणार आहे.
'TDM'ला थिएटर स्क्रीन मिळत नसल्यानं अजित पवार यांनी केलं ट्वीट; म्हणाले, 'अत्यंत दुर्दैवी...'
Bhaurao Karhade TDM Marathi Movie : भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांना 'ख्वाडा'आणि 'बबन' या चित्रपटांमध्ये विशेष लोकप्रियता मिळाली. आता त्यांचा 'टीडीएम' (TDM) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाला थिएटलमध्ये स्क्रीन मिळत नसल्यानं या चित्रपटाच्या टीमला अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर टीडीएम या चित्रपटाच्या टीमचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, टीडीएम चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नसल्यानं या चित्रपटातील कलाकार भावूक झाले आहेत. आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच 'टीडीएम' चित्रपटाबाबत एक ट्वीट शेअर केले आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 2, 2023
Maharashtra Shahir: नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत; अनेकांनी केलं "महाराष्ट्र शाहीर" चित्रपटाचं कौतुक, म्हणाले...
Maharashtra Shahir: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) हा चित्रपट 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी हा चित्रपट पाहिला. शरद पवार यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. अनेक सेलिब्रिटींनी आणि नेत्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
PS 2 Box Office Collection: 'पोन्नियिन सेल्वन-2' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच; चार दिवसात 200 कोटींचा टप्पा केला पार
PS 2 Box Office Collection: हिस्टॉरिकल ड्रामा फिल्म 'पोन्नियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) 28 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आली. पोन्नियिन सेल्वन चित्रपटाच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ‘PS 2’ हा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिस रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
Breaking barriers and conquering the globe! #PS2 soars high and crosses over 200 crores worldwide!#PS2RunningSuccessfully #CholasAreBack#PS2 #PonniyinSelvan2 #ManiRatnam @arrahman @madrastalkies_ @LycaProductions @RedGiantMovies_ @Tipsofficial @tipsmusicsouth @IMAX… pic.twitter.com/ACB22nrrSX
— Lyca Productions (@LycaProductions) May 1, 2023
Maharashtrachi Kitchen Queen: "सुगरणींनो, पदर खोचून तयार रहा"; 'महाराष्ट्राची किचन क्वीन' कार्यक्रम येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Maharashtrachi Kitchen Queen: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. संकर्षण हा लवकरच एका कुकिंग शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कुकिंग शोचे नाव 'महाराष्ट्राची किचन क्वीन' (Maharashtrachi Kitchen Queen) असं आहे. या कार्यक्रमचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, संकर्षण 'महाराष्ट्राची किचन क्वीन' या कार्यक्रमाची माहिती प्रेक्षकांना देत आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
