Debina Bannerjee: प्रसुतीनंतर वजन वाढलं, लोक छोटा हत्ती म्हणून ट्रोल करायचे; रामायणात सीतेची भूमिका केलेल्या देबिना बॅनर्जीने सांगितली आठवण
Ramayana Sita Actress Debina Bonnerjee : टेलिव्हिजन अभिनेत्री देबिना बॅनर्जीने ट्रोल्सना चोख उत्तर दिले आहे. प्रसुतीनंतर तिचे वजन मोठ्या प्रमाणात वाढल्याने तिला सोशल मिडीयावर ट्रोल केले गेले.
Debina Responds To Trolls : रामायण मालिकेत सीतेच्या पात्रामुळे फेमस झालेली अभिनेत्री देबिना बॅनर्जी ही तिच्या सोशल मिडीयावर (Social Media) खूप सक्रिय असते. याकारणाने तिचे अनेक चाहते आहेत. सोबतच ती तिच्या हटके लूकमुळे कायम चर्चेत असते. प्रसुतीनंतर अभिनेत्रीला ट्रोल्सचा मोठा सामना करावा लागला होता. एका मुलाखतीच्या वेळी तिने सांगितले की, प्रसुतिनंतर तिला अनेक भयानक गोष्टींचा सामना करावा लागला होता. तिच्यावर करण्यात येणाऱ्या कमेंट्मुळे तिला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. लोक तिला 'छोटा हत्ती' म्हणायचे. दोन मुलींच्या जन्मानंतर तिचे वजन मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र तिने आता या ट्रोल्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
देबिना बॅनर्जीनेने अलिकडेच तिच्या व्लाॅगमध्ये सांगितले की, मी कधीच माझा वर्कआऊट चुकवत नाही. तसेच यावेळी तिने सांगितले की, लोक म्हणायचे केवढी जाड झाली आहे, खरेच छोट्या हत्तीसारखी दिसत आहे. मला कळत नाही लोक असे का म्हणतात. मला वाटते लोक काहीही म्हणो, तुम्ही मेहनत करायचे सोडू नका. आयुष्यात तुम्हाला असे अनेक लोक भेटणार जे तुम्हाला मागे खेचणार. अशा सगळ्या गोष्टींना सकारात्मकतेने घेणे गरजेचे आहे. तरच आपली प्रगती होणार आहे. आपल्या दिशेने मनापासून वाटचाल करत राहा.
तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी तिने म्हणाली की, काहीही झाले तरी रोजचा वर्कआऊट कधीही चुकवायचा नाही असे मी ठरवले होते. खरे तर वाढलेले वजन कमी करणे हे खूप अवघड काम आहे. ट्रोल करणारे मला वाईट बोलत राहिले पण मी त्याकडे लक्ष न देता माझे काम करत राहिले. या कमेंट्समुळे मी मोठ्या प्रमाणात प्रेरित झाले आणि मी माझे वजन कमी केले.
ती पुढे म्हणाली व्यायामासाठी मी तब्बल 20 किमी लांब जायचे आणि रिकाम्या जागेत जाऊन तासनतास व्यायाम करायची. तसेच तिचा पती अभिनेता गुरमित चौधरी आणि ती पहाटे 4 वाजता उठतात आणि व्यायाम करण्याकरता ठरलेल्या जागी जातात.
टेलिव्हिजन कपल देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) हे दोघे आपली मुलगी दिविशाचे जावळ करण्याकरता वाराणसीला गेले होते. मुलीच्या जावळानंतरचे वाराणसीतले फोटो गुरमीत चौधरीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकले होते. ज्या फोटोखाली त्यांनी कॅप्शन लिहिले होते, "भारताच्या अध्यात्मिक जागी आम्ही आमच्या मुलीचे जावळ काढले आहे. हर हर महादेव."
'रामायण'मधील राम-सीतेच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध झालेले गुरमीत चौधरी आणि देबिना बोनर्जी आज घराघरात ओळखीचे झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या