उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
एकीकडे वेलकम टू द जंगल हा प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच 'वेलकम 4' मधूनही मोठी स्टारकास्ट चाहत्यांच्या मनोरंजनासाठी येत आहे.

बॉक्स ऑफिसरवर हीट ठरलेल्या वेलकम (Wel come) सिनेमाने चाहत्यांच्या मनात घरं केलं, तुफान विनोदी कलाकृती ठरलेल्या चित्रपटावर चाहत्यांनी भरभरुन प्रेम केलं. त्यामुळेच, वेलकमचा सिक्वलही प्रदर्शित झाला आणि तोही सुपरहीट ठरला. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या चित्रपटाने उदय शेट्टी आणि मजनू भाई सारख्या पात्रांना पॉप कल्चरमध्ये कायमचे अजरामर स्थान मिळाले. आजही सोशल मीडियावर वेलकम सिनेमातील मिम्स मनोरंजन करतात. तर, 2015 मध्ये आलेल्या जॉन वेलकम 2 मध्ये अभिनेता जॉन अब्राहम आणि श्रुती हासन दिसले होते. आता, वेलकमचा तिसरा भाग 'वेलकम टू द जंगल' प्रदर्शनासाठी तयार असतानाच अभिनेता सुनिल शेट्टीने (sunil shetti) वेलकम 4 बाबत माहिती दिलीय.
एकीकडे वेलकम टू द जंगल हा प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच 'वेलकम 4' मधूनही मोठी स्टारकास्ट चाहत्यांच्या मनोरंजनासाठी येत आहे. बॉलिवूडमधील सूत्रांच्या माहितीनुसार, निर्मात्यांनी आता 'वेलकम 4' वरही काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात पुन्हा एकदा नाना पाटेकर, परेश रावल आणि अनिल कपूर यांचे त्रिकुट प्रेक्षकांना हसवताना पाहायला मिळेल. मिड-डेच्या रिपोर्टनुसार, फिरोज ए. नाडियाडवाला आणि त्यांच्या लेखकांची टीम या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर वेगाने काम करत असून ही स्क्रीप्ट पुढे सरकली आहे. वेलकमप्रमाणेच या चित्रपटात अनेक डॉन जे कॉमेडियन रुपात दिसतील आणि विनोदी, ग्लॅमर आणि ॲक्शनचा भरपूर तडका चाहत्यांना पाहायला मिळेल. विशेष म्हणजे सुनिल शेट्टीनेच वेलकम 4 बाबत माहिती दिलीय.
सुनिल शेट्टीचे ट्विट
वेलकम 4 चित्रपटाबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, सुनील शेट्टीने ट्विट करुन म्हटले की, 'अराजकतेच्या काळात, काही बातम्या फक्त योग्य वाटतात. 'वेलकम' सिनेमाच्या चाहत्यांचा आत्मा असलेले नाना, अनिल आणि परेश परत आले आहेत. त्यांच्याएवढा टोकाचा, प्रतिभासंपन्न वेडेपणा कोणीही करू शकत नाही. या सर्वांना योग्य जागेवर पाहून खूप आनंद होत आहे. वेलकम4.', असे सुनिल शेट्टीने म्हटले. त्यामुळे, वेलकम 4 मध्येही हे त्रिकुट झळकणार असून चाहत्यांना पोट धरुन हसवणार असल्याचं म्हणता येईल.
In times of chaos, some news just feels… right. The OG madness - Nana, Anil & Paresh - the heartbeat of the Welcome universe are back. And no one does madness with that much brilliance.
— Suniel Shetty (@SunielVShetty) March 8, 2026
So happy to see the boys back where they belong. #Welcome4
'वेलकम टू द जंगल' कधी रिलीज होणार?
सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या 'वेलकम टू द जंगल' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल, अर्शद वारसी, रवीना टंडन, दिशा पटानी, आफताब शिवदासानी, राजपाल यादव, जॅकी श्रॉफ आणि 30 हून अधिक कलाकारांसोबत बनत आहे. यापूर्वी अनेकवेळा हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला, पण आता 26 जून 2026 ही सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र, सध्या 'वेलकम 4' ची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, पण माध्यमांतील वृत्तानुसार 2027 वेलकम 4 प्रदर्शित होऊ शकतो.
हेही वाचा
Bigg Boss Marathi 6: एलिमिनेट होताच रुचिता भेटली बिग बॉसच्या खास स्पर्धकाला, व्हिडिओ टाकत म्हणाली...























