एक्स्प्लोर

Salim Khan Wanted To Be An Actor: बनायचं होतं स्टार, पण नशीबानं नाही दिली साथ, नंतर अमिताभना बनवलं 'अँग्री यंग मॅन'; आज मुलगा इंडस्ट्रीचा 'सुपरस्टार', ओळखलं का कोण?

Salim Khan Wanted To Be An Actor: इंडस्ट्रीच्या दिग्गजानं त्याची लेखणी उचलली आणि इंडस्ट्रीला अशा कहाण्या दिल्या, ज्या रुपेरी पडद्यावर अजरामर झाल्या. पण, सुपरस्टार बनण्याचं जे स्वप्न होतं, ते मुलानं पूर्ण केलं.

Salim Khan Wanted To Be An Actor: दिसायला सुंदर, मोठी स्वप्न आणि त्यासोबतच प्रतिभा असेल, तर बॉलिवूडमध्ये (Bollywood News) जम बसवणं काही अवघड नाही. कधीकधी सगळं नशीबाच्या हातात असतं, असं म्हणतात. पण, त्यापैकी काही माणसं आपलं नशीब स्वतः लिहितात, असंच एका बॉलिवूडच्या दिग्गजासोबत घडलेलं. कित्येक वर्षांपूर्वी एका तरुणाकडे पाहून कोणीही सांगितलं असतं की, अरे हा तर हीरो मटेरियल आहे. यानं इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यावर अभिनेता म्हणून नशीबही आजमावलं. याच्या नशीबात चमकणंच लिहिलेलं, पण अभिनयातून नाहीतर त्याच्या लेखणीतून. प्रेक्षकांना काय हवंय आणि आपण काय लिहिलं पाहिजे, हे यानं खूप आधीच ओळखलेलं. त्यामुळे या व्यक्तीनं जे-जे लिहिलं, त्याच्या लेखणीच्या जादूनं अनेकांचं नशीब उजळलं. यानं त्याची लेखणी उचलली आणि इंडस्ट्रीला अशा कहाण्या दिल्या, ज्या रुपेरी पडद्यावर अजरामर झाल्या. पण, सुपरस्टार बनण्याचं जे स्वप्न होतं, ते मुलानं पूर्ण केलं. आम्ही ज्या व्यक्तीबाबत सांगितलंय की, सलीम खान (Salim Khan). हिंदी सिनेसृष्टीचे (Hindi Industry) दिग्गज 'द सलीम खान'.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलीम खान यांचं पूर्ण नाव सलीम अब्दुल रशीद खान. यांचे पूर्वज अफगाणिस्तानातून भारतात आलेले आणि त्यानंतर इंदौरमध्ये आपलं बस्तान बसवलं. पण, सलीन खान यांचं लहानपण वाटतं तेवढं सोपं नव्हत. लहानवयातच त्यांनी आपल्या आईला टीबीमुळे गमावलं आणि त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांच्या वडिलांचंही निधन झालं. अवघ्या दहाव्या वर्षी ते अनाथ झाले. सधन कुटुंबातून असूनही सलीम यांनी एकही रुपया न घेता रिकाम्या खिशानं थेट मुंबई गाठली. मरिन ड्राईव्हमधल्या एका गेस्ट हाऊसमध्ये 55 रुपये महिना देऊन अर्धी खोली भाड्यानं घेतली. पोटाची खळगी भरण्यासाठी मॉडलिंग केली आणि त्यानंतर फिल्म्समध्ये लहान-सहान रोल मिळू लागले. 1960 मध्ये 'बारात'मधून त्यांनी पदार्पण केलं, पण हा सिनेमा फारसा यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं,  पण कधीही प्रमुख अभिनेता म्हणून स्वतःला स्थापित करू शकले नाही. सलीम खान यांनी स्वतः कबूल केलं की, ते चांगले अभिनेता नव्हते, पण ते पात्र समजून घेण्यात पारंगत होते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अभिनेता म्हणून संघर्ष केल्यानंतर, सलीम खान यांनी लेखनाचा मार्ग निवडला. त्यांनी जावेद अख्तर यांच्यासोबत सलीम-जावेद जोडीची स्थापना केली आणि यामुळे त्यांच्या नशिबात एक महत्त्वाचा टप्पा आला. 'जंजीर', 'दीवार', 'शोले' आणि 'डॉन' सारख्या सिनेमांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एका नव्या युगाची सुरुवात केली. या सिनेमांनी अमिताभ बच्चन यांना 'अँग्री यंग मॅन' म्हणून स्थापित केलं आणि सिनेसृष्टीतल्या लेखकांनाही ओळख मिळवून दिली. सलीम यांनी 1964 मध्ये सलमा यांच्याशी लग्न केलं. नंतर त्यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरी लग्नगाठ बांधली. स्वतःला सुपरस्टार व्हायचं होतं, पण त्यांचं हे स्वप्न त्यांच्या मुलानं पूर्ण केलं. आज सलीम यांचा मुलगा सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

दररोज फक्त 10 रुपये कमवायचा 'हा' अभिनेता; पोट भरण्यासाठी एक प्लेट 'छोले-चावल', मग नशीब फळफळलं अन् आज करतोय बॉलिवूडवर राज्य

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Actor Yash On Ramayana 4000 Crore Budget: स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
Actress Hayden Panettiere Passes Away: वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन
वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन
Tukaram Munde On Bollywood Actors Pan Masala Advertisement: शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Embed widget