Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
ध्यास... ज्यासाठी माणूस त्याचा प्रत्येक श्वास खर्ची घालतो तो ध्यास.. पालघर जिल्ह्यातल्या वाळवंडा गावात गेली काही वर्ष एक ध्यासपर्व सुरु आहे...हा ध्यास आहे आपली परंपरा जपण्याचा, हा ध्यास आहे संस्कृती जतन करण्याचा, स्वत्व टिकवण्याचा आणि हा ध्यास आहे जगासमोर आपली ओळख मिळवण्याचा...आणि याच ध्यासासाठी ज्यांनी शब्दशः आपले श्वास वेचले ते पद्मश्री भिकल्या धिंडाजी आज कट्ट्यावर आलेत. नकळत्या वयात हातात घेतलेलं तारपा वाद्य आज त्यांच्या श्वासाची लय बनलंय. गुरं-ढोरं चरायला नेताना तारपा बनवण्याचा आणि वाजवण्याचा छंद त्यांना जडला.. सह्याद्रीच्या दराखोऱ्यांनाही साद घालणाऱ्या त्यांच्या तारपाच्या सुराने दिल्ली दरबारालाही दखल घ्यायला लावली.. पालघरच्या जव्हारच्या छोट्याशा पाड्यावरुन हा प्रवास सुरु झाला... हाताला चार पैसे मिळावेत म्हणून कधी मजूरी करावी लागली, कधी धान्याच्या कणगीत जे काही उरलं असेल त्यातून कुटुंबाचं पोट भरण्याची वेळ आली... तर कधी उदरनिर्वाहासाठी हातात तारपा तीर्थक्षेत्र धुंडाळावी लागली...पण अशाही परिस्थितीत नव्या पिढीलाही तारपा वादनाची कला शिकवण्यासाठी ते धडपडत राहिले, ती धडपड आजही सुरु आहे. ९० वर्ष परिस्थितीशी झुंज देऊन लोककला जपणाऱ्या आणि जोपासणाऱ्या भिकल्याजींची परिस्थिती आज पद्मश्री मिळाल्यानंतरही फार बदललेली दिसत नाहीये. त्यांची मुलं ठोस रोजगार नसल्याने रोजंदारीवर काम करतात...आजही त्यांच्या घराला मजबूत छप्पर आणि भक्कम भिंती नाहीत...पण परिस्थितीसमोर झुकायचं नाही हा मातीचा संस्कार जपत आज ते तेवढ्याच दमदारपणे तारपावादन करतायत... त्यांचा हा प्रवास कट्ट्यावर उलगडूया...
All Shows































