India won T20 World Cup : विश्वविजयी भारत! गौतम गंभीरनेही रचला इतिहास, एमएस धोनीला मागे टाकत तिसऱ्यांदा कोरलं T20 च्या विश्वचषकावर नाव
Gautam Gambhir : भारताने न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. तर टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात अनेक नवे विक्रमही रचले आहेत. तर गौतम गंभीरने तिसरा विश्वचषक जिंकून इतिहास रचलाय.

Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत 2026 चा टी-20 विश्वचषकावर भारतीय संघाचं नाव कोरलंय. या दमदार विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा (India Win T20 World Cup 2026) मान मिळवलाय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात (IND Vs NZ Final) टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवत केवळ ट्रॉफी जिंकली नाही, तर टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात अनेक नवे विक्रमही रचले आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करत इतिहास घडवला. सूर्यकुमार यादव भारताचा पहिला विश्वचषक विजेता कर्णधार बनला, तर गौतम गंभीरने तिसरा विश्वचषक जिंकून इतिहास रचलाय.
Gautam Gambhir : गौतम गंभीरने तिसरा विश्वचषक जिंकला, इतिहास रचला
भारतासाठी सर्वाधिक विश्वचषक विजयांच्या बाबतीत गौतम गंभीरने आता एमएस धोनीला मागे टाकले आहे. गौतम गंभीर 2007 च्या टी-20 विश्वचषक विजेत्या भारताच्या संघाचा भाग होता. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात मॅचविनिंग 75 धावा केल्या. त्यानंतर गंभीरने 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघात महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळीही गंभीर अंतिम सामन्यात चमकला आणि 97 धावा केल्या. गंभीर आणि धोनीने खेळाडू म्हणून प्रत्येकी दोन विश्वचषक जिंकले आहेत. पण आता गंभीरने प्रशिक्षक म्हणूनही विश्वचषक जिंकला आहे. एकूणच, सर्वाधिक विश्वचषक जिंकण्याच्या बाबतीत गौतम गंभीरने आता एमएस धोनीला मागे टाकले आहे.
T20 World Cup 2026 : भारताने 96 धावांनी विजय मिळवला
भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी अवघ्या सहा षटकांत 92 धावा करत तुफान खेळी केली. अभिषेकने 18 चेंडूत अर्धशतक ठोकले, जे टी 20 विश्वचषक फायनलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक आहे. अभिषेकने 52 धावा केल्या आणि इशान किशननेही 54 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत, जसप्रीत बुमराहच्या चार विकेट्स आणि अक्षर पटेलच्या तीन विकेट्सनेही भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
न्यूझीलंडकडून टिम सीफर्टने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार मारले. मात्र संघातील सात फलंदाज एक अंकी धावसंख्येत बाद झाले. केवळ 72 धावांवर न्यूझीलंडचे पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. डॅरिल मिचेलने 11 चेंडूत 17 धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सॅन्टनरने 35 चेंडूत 43 धावांची झुंज दिली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर अक्षर पटेलने 3 विकेट घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.
इतर महत्वाच्या बातम्या





















