Influenza B Virus: अभिनेत्री देबिना बॅनर्जीला 'इन्फ्लुएन्जा बी' व्हायरसची लागण; काय आहेत लक्षणं? जाणून घ्या
अभिनेत्री देबिना बॅनर्जीला (Debina Bonnerjee) 'इन्फ्लुएन्जा बी' या व्हायरसची लागण झाली आहे. नुकतीच तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
![Influenza B Virus: अभिनेत्री देबिना बॅनर्जीला 'इन्फ्लुएन्जा बी' व्हायरसची लागण; काय आहेत लक्षणं? जाणून घ्या Actor Debina Bonnerjee Infected With Influenza B Virus says Staying Away From My Babies Influenza B Virus: अभिनेत्री देबिना बॅनर्जीला 'इन्फ्लुएन्जा बी' व्हायरसची लागण; काय आहेत लक्षणं? जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/02/1ce4ecdf45ebc9e420ae50508c5788de1677741350201259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Debina Bonnerjee: अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं एका मेडिकल टेस्टचा रिपोर्ट शेअर केला. देबिनाला 'इन्फ्लुएन्जा बी' (Influenza B Virus) व्हायरसची लागण झाली आहे. देबिना काही दिवसांपूर्वी तिच्या कुटुंबासोबत श्रीलंका येथे ट्रीपसाठी गेली होती. देबिनाने तिच्या या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता देबिनाने तिला 'इन्फ्लुएन्जा बी' व्हायरसची लागण झाली आहे, अशी माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना दिली. या पोस्टमध्ये तिनं इन्फ्लुएन्जा बी व्हायरसची लक्षण देखील सांगितली आहेत.
देबिनाची पोस्ट
देबिनाने सोशल मीडियावर तिच्या मेडिकल टेस्टचा रिपोर्ट शेअर करुन लिहिलं आहे की, "मला इन्फ्लुएन्जा बी व्हायरसची लागण झाली आहे. मी सध्या माझ्या बाळांपासून लांब राहात आहे. इन्फ्लुएन्जा बी व्हायरसची लक्षण ताप आणि सर्दी ही आहेत."
15 फेब्रुवारी 2011 रोजी देबिना आणि अभिनेता गुरमीत चौधरीसोबत लग्नगाठ बांधली. 3 एप्रिल 2022 रोजी देबिना आणि गुरमीत यांच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झालं. देबिना आणि गुरमीतनं तिचे नाव लियाना असं ठेवलं. तर 11 नोव्हेंबर 2022 रोजी देबिना आणि गुरमीत दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. देबिना आणि गुरमीत यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीचं नाव दिवीशा असं ठेवलं.
View this post on Instagram
देबिनाने या मालिकांमध्ये केलं काम
देबिनाने 'रामायण', 'चिडिया घर', 'संतोषी मां', 'तेनाली रामा', 'अलादिन - नाम तो सुना होगा' आणि इतर अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. तिने डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये 6' मध्ये देखील भाग घेतला होता आणि लोकप्रिय स्टंट-आधारित शो 'खतरों के खिलाडी 5' मध्ये ती स्पर्धक होती. छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे देबिनाला विशेष लोकप्रियता मिळाली. तर गुरमीतने कुमकुम, पुनर्विवाह - जिंदगी मिलेगी दोबारा या मालिकांमध्ये काम केलं आहे. दोघेही एमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. देबिनाचे एक युट्यूब चॅनल देखील आहे. या चॅनलवर ती व्लॉग्स शेअर करत असते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)