Ind vs NZ Final T20 World Cup 2026: सगळ्यांना बाहेर काढलं, खिडकीवरील पडदा लावला...; विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन जय शाह सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरला कुठे घेऊन गेले?, VIDEO
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवला आणि भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.

Ind vs NZ Final T20 World Cup 2026: सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं आयसीसी टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2026) नवा इतिहास घडवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी (Ind vs NZ Final) धुव्वा उडवला आणि भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आयसीसी टी-20 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला.
न्यूझीलंडला पराभूत करुन पुन्हा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. भारतीय संघातील खेळाडूंचे कुटुंबीय देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या संजू सॅमसन, अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) या तीन फलंदाजांनी न्यूझीलंडच्या आक्रमणाच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या. भारताने सलामीच्या फलंदाजांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर भारतानं 20 षटकांत पाच बाद 255 धावांची मजल मारली होती.भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव 159 धावांत कोलमडला. भारताकडून जसप्रीत बुमरानं चार, तर अक्षर पटेलनं तीन विकेट्स काढून न्यूझीलंडला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर जय शाह, सूर्यकुमार, गंभीर हनुमानाच्या मंदीरात- (Suryakumar Yadav, Gautam Gambhir Jay Shah Visit Hanuman Temple)
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर तसेच सर्व सेलिब्रेशन झाल्यानंतर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षत गौतम गंभीर टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन अहमदाबादमधील हनुमान मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. दरम्यान, यावेळी अनेक फोटोग्राफर आणि माध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. परंतु जय शाह यांनी सगळ्यांना मंदिराच्या बाहेर जाण्याची विनंती केली. तसेच मंदिराच्या खिडकीवर एक पडदा होता, तिकडूनही काही लोक फोटो-व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करत होते. हे पाहता जय शाह यांनी मंदिरातील कर्मचाऱ्यांना खिडकीचा पडदाही लावायला सांगितला. दरम्यान, मंदिरात आणि मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने जय शाह यांनी खबरदारी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
#WATCH | Gujarat: ICC Chairman Jay Shah, Team India Head Coach Gautam Gambhir, along with Skipper Surya Kumar Yadav, offered prayers at the Hanuman Temple in Ahmedabad.
— ANI (@ANI) March 8, 2026
The Men in Blue crushed New Zealand by 96 runs to lift the #ICCT20WorldCup2026 pic.twitter.com/71SWAraDre
#WATCH | Gujarat | Team India Skipper Surya Kumar Yadav, offered prayers at the Hanuman Temple in Ahmedabad after winning the #icct20worldcup2026 pic.twitter.com/QoCBEa6vPm
— ANI (@ANI) March 8, 2026
न्यूझीलंडचा डाव कसा राहिला? (Ind vs NZ Final T20 World Cup 2026)
256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. टिम सीफर्ट आणि फिन अॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर कीवी संघाची घसरण सुरू झाली. न्यूझीलंडकडून टिम सीफर्टने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार मारले. मात्र संघातील सात फलंदाज एक अंकी धावसंख्येत बाद झाले. केवळ 72 धावांवर न्यूझीलंडचे पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. डॅरिल मिचेलने 11 चेंडूत 17 धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सॅन्टनरने 35 चेंडूत 43 धावांची झुंज दिली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 3 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.
संबंधित बातमी:




















