Chhaava Box Office Collection Day 11: बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं तुफान; अकराव्या दिवशी कमाई घटली, पण तरी दिग्गजांना धूळ चारली
Chhaava Box Office Collection Day 11: विक्की कौशलची फिल्म छावानं 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या फिल्ममध्ये विक्की कौशलसोबतच रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत.

Chhaava Box Office Collection Day 11: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपट प्रदर्शित होऊन 11 दिवस झाले आहेत आणि आतापर्यंत या चित्रपटानं बंपर कमाई केली आहे. लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित या चित्रपटानं देशातच नव्हे तर परदेशातही खूप कमाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) पुत्र छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटानं देशभरात 300 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. महाशिवरात्रीची सुट्टी आणि येणाऱ्या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट सुमारे 600 कोटी रुपयांचा टप्पा गाठू शकेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
बॉक्स ऑफिसवर (Box Office) विक्की कौशलच्या 'छावा'ची रेकॉर्डब्रेक कमाई सुरू आहे. या चित्रपटानं अवघ्या 10 दिवसांत 300 कोटींचा टप्पा ओलांडला. दरम्यान, अकराव्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. त्यामुळे 'छावा' 350 कोटी रुपयांचा आकडा गाठू शकला नाही.
तब्बल 130 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा 'छावा' हा चित्रपट या वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा 'छावा' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडतो. मुघल साम्राज्याचा बादशहा औरंगजेब याला वाटतं की, शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतर दख्खनमध्ये त्याला टक्कर देणारा कोणीही आता शिल्लक राहिलेला नाही, पण त्याला हे माहीत नाही की, त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज आहेत, जे त्याचा कोणताही हेतू यशस्वी होऊ देणार नाहीत.
View this post on Instagram
'छावा'ची आतापर्यंतची कमाई
'छावा'नं नवव्या दिवशी (दुसरा शनिवार) 44 कोटी आणि दहाव्या दिवशी (दुसरा रविवार) 40 कोटींचा गल्ला जमवला. अशातच Sacnilk च्या रिपोर्टनुसार, फिल्मनं अकराव्या दिवशी 18.50 कोटींची कमाई केली आहे. अद्याप फिल्मच्या अकराव्या दिवसाच्या कलेक्शनचा आकडा अजूनपर्यंत ऑफिशिअली समोर आलेला नाही. पण, जर फिल्मनं 18.50 कोटींची कमाई केली असेल, तर आतापर्यंतच फिल्मचं टोटल कलेक्शन 345.25 कोटींवर पोहोचलं असेल. म्हणजेच, 350 कोटींचा आकडा 'छावा'ला अद्याप गाठता आलेला नाही. अशातच, बुधवारी असलेल्या महाशिवरात्रीच्या सुट्टीचा 'छावा'ला फायदा होण्याची शक्यता आहे.
फिल्मच्या पहिल्या आठवड्याचं कलेक्शन
'छावा'नं पहिल्या दिवशी 31 कोटींची कमाई केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई वाढली आणि चित्रपटानं अनुक्रमे 37 आणि 48.5 कोटींची कमाई केली. तर, चौथ्या दिवशी 24 कोटी, पाचव्या दिवशी 25.25 कोटी, सहाव्या दिवशी 32 कोटी आणि सातव्या दिवशी 21.5 कोटी रुपये कमावले. पहिल्या आठवड्यात चित्रपटाचं एकूण कलेक्शन 219.25 कोटी रुपये आहे.
दरम्यान, 'छावा' चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात विक्की कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना हिनं त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसून आला आहे. तर, या चित्रपटात आशुतोष राणा देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर चाहते खूप भावूक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
