एक्स्प्लोर

Yash Raj Films Spy Universe: पठाणनंतर आता यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील 'हे' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; नावं माहितीयेत?

पठाण (Pathaan) चित्रपटाच्या यशानंतर यशराज फिल्म्सच्या (Yash Raj Films) स्पाय युनिव्हर्समधील काही  चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांच्या नावाबद्दल...

Yash Raj Films Spy Universe: यशराज फिल्म्स (Yash Raj Films) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस आहे.  यशराज फिल्म्सने हिंदी इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. स्पाय थ्रिलर चित्रपटाची निर्मीती देखील यशराज  फिल्म्स बॅनरने केली आहे. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची निर्मिती देखील  यशराज फिल्म्सनं केली. पठाण चित्रपटाच्या यशानंतर यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील काही  चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांच्या नावाबद्दल...

तरण आदर्शनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील आगामी चित्रपटांची नावं चाहत्यांना  सांगितली आहेत.  वॉर 2 (War 2), टाइगर 3, (Tiger 3), टाइगर वर्सेज पठाण (Tiger Vs Pathaan) हे तीन यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील आगामी चित्रपट आहेत. याआधी यशराज फिल्म्सनं एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठाण या स्पाय चित्रपटांची निर्मिती केली. आता  यशराज फिल्म्सच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सकतेने वाट बघत आहेत.

अजून वॉर 2, टाइगर 3, टाइगर वर्सेज पठाण या चित्रपटांची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. यामधील वॉर 2 (War 2) या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आदित्य चोप्रा हे अयानला (Ayan Mukerji) देणार आहेत, असं म्हटलं जात आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

यशराज फिल्म्सनं चार स्पाय थ्रिलर चित्रपटांची निर्मिती केली. आता या चित्रपटांची निर्माती करणाऱ्या कंपनीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. यामधील टाइगर 3 या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कतरिना कैफ हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 'एक था टायगर' हा चित्रपट 2012मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाच्या पाच वर्षानंतर म्हणजेच 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच टायगर-3 प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

2019 मध्ये रिलीज झालेल्या 'वॉर' चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले होते. या चित्रपटात हृतिकसोबतच टायगर श्रॉफचीही भूमिका होती. आता वॉर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ayan Mukerji: अयान मुखर्जी करणार 'वॉर 2' चे दिग्दर्शन? ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या दोन भागांबाबत देखील दिली मोठी अपडेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget