एक्स्प्लोर

धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 

उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह (burnt body) सापडला आहे.

Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह (burnt body) सापडला आहे. गेल्या 4 दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता होती.  आज या चिमुकल्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

उल्हासनगरमध्ये तीन वर्षीय मुलीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. उल्हासनगर कॅम्प 5 मधील हिललाईन पोलीस स्टेशनच्या जवळ ही घटना घडली आहे. चार दिवसांपासून मुलगी बेपत्ता होती. यानंतर आज हिललाईन पोलीस स्टेशनच्या मागे या मुलीचा मृतदेह सापडला  आहे. दरम्यान, प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. 

पोलीस अधिकारी नेमकं काय म्हणाले? 

दरम्यान, या घटनेबाबात पोलिस उपायुक्त सचिन गोरे (Deputy Commissioner of Police Sachin Gore)  यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 तारखेला मुलगी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे या घटनेचा तपास दिला होता. त्यानंतर आज मुलीचा मृतदेह आढळला आहे. यानंतर पोलीसांचे पथक, क्राईम ब्रँचच्या पथकाचे अधिकारी तपास करत आहेत. दरम्यान, मुलीचा मृतदेह पीएम साठी पाठवत आहोत. पीएमनंतर मुलीच्या मृत्यूचं कारण कळेल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दोन दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता होती. सव्वा तीन वर्षांची ही मुलगी असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासातून अद्यार काही निष्पन्न झालेलं नाही. पोलीस अधिकचा तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर तपासातील सर्व गोष्टी सांगणार असल्याचे पोलीस अधिकारी म्हणाले. 

बदलापूरची घटना ताजी असतानाच उल्हासनगरमध्ये लहान मुलीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच बदलापूर (Badlapur) मधील एका नामांकित शाळेमधील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार (Badlapur School Sexual Assault Case) झाल्याची घटना घडली होती. या शाळेमध्ये लहान मुलीवर अत्याचारची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेवरुन राज्यातील राजकीय वातावरण देखील तापल्याचं पाहायला मिळालं होतं. या घटनेवरुन राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. अशातच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर भागात एका सव्वा तीन वर्षाच्या चिमुकलीचामृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या घटमुळं पुन्हा एकदा राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात चर्चा होत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Aditya Thackeray vs Eknath Shindeठाकरे-शिंदे आमनेसामने, त्या बैठकीत नेमकं काय घडलंKunal Kamra Controversy Shiv Sena Todfod :  कुणाल कामराचं वादग्रस्त विडंबन, राजकारणात टीकेचा सूरSpecial Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget