एक्स्प्लोर

BGT 2024: ऑस्ट्रेलियात अग्नि'पर्थ'

२०१८-१९ - निकाल - भारत -२-१ने विजयी
२०२०-२१ - निकाल - भारत - २-१ ने विजयी
२०२४-२५ - हॅटट्रिक?

कांगारुंवर स्वारी करताना ही स्वप्नवत आकडेवारी पाहायला प्रत्येक भारतीय चाहत्याला नक्की आवडेल. पण, हे प्रत्यक्षात घडेल का?

मी स्वप्नवत म्हटलं, याची कारणं दोन कारण एक -समोर कमिन्सची घातक ऑसी टीम आहे आणि कारण दुसरं - आपला सध्याचा चाचपडणारा टेस्ट मॅच फॉर्म. खास करुन फलंदाजांचा गटांगळ्या खाणारा फॉर्म. किवींच्या विरोधात मायभूमीवर आपल्याला त्यांनी ०-३ ने नाक घासायला लावलं. फलंदाजी अशी कोलमडत गेली की, पत्त्याच्या बंगल्याचा स्पीडही कोसळताना कमी वाटेल. ज्या फिरकीने आतापर्यंत आपण समोरच्या टीम्सना अगदी ऑस्ट्रेलियालाही अनेकदा शरणागती पत्करायला लावली. त्याच फिरकीच्या सापळ्यात आपण अडकलो आणि किवींविरुद्ध पराभूत झालो. ही सगळी मरगळ, निराशा झटकून आपल्याला या अग्निदिव्याला सामोरं जायचंय. पर्थमधील नाकापर्यंत उसळणाऱ्या खेळपट्टीवर पहिल्या लढाईला उद्या तोंड फुटतंय. समोर आपल्याविरुद्ध गेल्या दोन मालिका पराभवांची भळभळती जखम झालेले ऑसी आहेत. त्याचवेळी आपल्याही किवींविरुद्धच्या पराभवाची जखम ओली आहे. त्यात रोहित शर्मा पहिल्या कसोटीत नाहीये. इथे बुमराच्या रुपात पहिल्या सामन्यात नवा नायक आपल्याला लाभलाय. या कसोटीनिमित्ताने एक योगायोग पाहायला मिळतोय. तो म्हणजे दोन्ही संघाचे कॅप्टन फास्ट बॉलर्स आहेत. हे फार दुर्मिळ पाहायला मिळतं.

बुमराची प्रेस कॉन्फरन्स पाहिल्यावर एक गोष्ट आज जाणवली की, तो फायटर आहे आणि मुख्य म्हणजे स्वत:ची छाप उमटवायला उत्सुक आहे. त्याने तसं सांगितलं देखील, तो म्हणाला, रोहित आणि विराटकडून मी खूप काही शिकलोय. तरीही मला कुणाचीही कॉपी करायटी नाहीये. तसंच किवी मालिकेबद्दल त्याला विचारलं असता तो म्हणाला, जे झालं मागे पडलं. एक वाक्य तो फार छान बोलून गेला. तो म्हणाला, क्रिकेट हा खेळ किती मजेशीर आहे पाहा....जो संघ सामना किंवा मालिका जिंकतो तोही पुढच्या सामन्यात शून्यातून सुरुवात करतो आणि जो ही मालिका किंवा सामना गमावतो तोही शून्यातूनच आगेकूच करतो. अशीच मनाची पाटी करुन आपल्याला ऑसींशी दोन हात करावे लागतील. त्याच वेळी माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी एक महत्त्वाची बाब सांगितली, ते म्हणाले, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेला सुरुवात होत असताना पहिली दोन सत्रं तुम्ही पकड सोडू नका. तिथेच पहिली पायरी आपण चढत असतो. त्याच वेळी भारतीय कसोटी फलंदाजीचा द्रविडनंतरचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराचं निरीक्षणही मोलाचं आहे. तो म्हणतोय, इथे नेथन लायनला तुम्ही जितकं निष्प्रभ कराल तितकं त्यांच्या फास्ट बॉलरवर प्रेशर येईल. तेव्हा लायनची लाईन अँड लेंथ सुरुवातीपासूनच डिस्टर्ब करणं हे तुमचं पहिलं टार्गेट पाहिजे. म्हणजे काही वेळा स्टेप आऊट होऊन किंवा काही वेळा स्वीपसारखे फटके खेळून ते होऊ शकतं. याकरता डावखुरं-उजवं फलंदाजीचं कॉम्बिनेशनही उपयुक्त ठरत असतं. सुदैवाची बाब म्हणजे आपल्या बॅटिंगमध्ये चार डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश आहे.

जैस्वाल, पड्डिकल, पंत आणि जर प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश झाला तर जडेजा असे चार डावरे फलंदाज आपल्या ताफ्यात असू शकतात. अर्थात यात जैस्वाल, पंत फिक्स आहे. तर रोहित, गिलच्या अनुपस्थितीत पड्डिकलही तिसऱ्या क्रमांकावर खेळणार हेही जवळपास निश्चित आहे. यामुळे जैस्वाल-राहुल ओपनिंग, तीन नंबर - पड्डिकल, चाौथ्या क्रमांकावर - द विराट कोहली. पाचव्या क्रमांकावर पंत, मग कदाचित सर्फराज खान, सातव्या नंबरवर ऑलराऊंडर ज्यात नितीश रेड्डी किंवा ताज्या दमाचा गोलंदाज हर्षित राणा. उरलेल्या चारमध्ये तीन फास्ट बॉलर्स ज्यात बुमरा, सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा असे तिघे. मग चौथी गोलंदाजाची जागा जडेजा किंवा अश्विन. बॅटिंगला आणखी ताकद द्यायची असेल तर वॉशिंग्टन सुंदर. असं प्लेईंग इलेव्हनचं कॉम्बिनेशन घेऊन आपण उतरु. यात राहुल आणि कोहली वगळता इतर बहुतेक सर्वच युवा फलंदाज पहिल्यांदाच ऑसी खेळपट्ट्यांवर खेळतील. साहजिकच या दोघांवर प्रमुख भिस्त आहे. दोघांकडेही क्लास आहे, टेम्परामेंट आहे, मोठे फटके आहेत.  गेल्या पाच डावांमधील दोघांची आकडेवारी पाहूया. राहुल - ०,१२,६८,१६,२२. तिन्ही सामने मायदेशातले. तर कोहलीच्या खात्यावर - ४,१,१,१७,०,७०. हा किवींविरुद्धच्या मालिकेतला स्कोअर. कोहलीच्या खात्यात गेल्या पाच वर्षांमध्ये ६१ डावांमध्ये ३३.४५ च्या सरासरीने अवघी तीन शतकं आहेत तर, त्याआधीच्या पाच वर्षांमध्ये ८९ इनिंगमध्ये २० शतकांच्या सहाय्याने त्याची सरासरी ६२.७८ इतकी कमाल होती. म्हणजेच वय वर्षे ३१ ते ३६ या काळात त्याची आकडेवारी घसरलेली दिसतेय. कोहलीचा कमाल फिटनेस लक्षात घेता यात वय हा जस्ट आकडा म्हटला तरीही ही आकडेवारी आपलं ब्लड प्रेशर वाढवणारी आहे. असं असलं तरी कोहली चॅम्पियन प्लेअर आहे आणि मोठे प्लेअर्स दमदार फॉर्मपासून एक इनिंग दूर असतात. या दोघांनीही भारतीय फलंदाजीची पालखी या पर्थच्या सामन्यात वाहावी लागेल.  

आपल्याकडे आक्रमक बॅटिंग करणारे दोन एक्स फॅक्टरवाले प्लेअर आहेत ते म्हणजे पंत आणि सर्फराज खान. निडर फलंदाजी करत ते समोरच्याला धुऊन काढतात. खास करुन जीवघेण्या अपघातातून सावरत पंतने केलेला कमबॅक जिद्द आणि इच्छाशक्तीचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तर स्ठानिक क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घालणारा सर्फराजही आपलं ट्रम्प कार्ड ठरु शकतो. अर्थात सरावाच्या वेळी त्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यानंतरच्या त्याच्या फिटनेसचं स्टेटस पाहूनच त्याला संघात समाविष्ट करण्यासंदर्भातला कॉल घ्यावा लागेल. त्याच्या जागी कदाचित मग ज्युरेल खेळू शकेल. जो पंतला विकेट किपिंगसाठी बॅकअप असेल. ऑसी भूमीवर पंतची बॅटिंग आपल्याला जास्त महत्त्वाची आहे. गेल्या वेळी अखेरच्या दिवशी तीनशे पार स्कोर करताना पंतने केलेली बॅटिंग अजूनही अंग शहारुन टाकते. तेव्हा गिलची नव्वदीतली खेळी, सुंदरने दाखवलेलं बर्फाला लाजवणारं टेम्परामेंट. या साऱ्यावर पंतच्या कामगिरीने चढवलेला कळस. कोई लौटा दे ये बिते हुए दिन. अर्थात आपल्याकडे अनुभवाची कमतरता असली तरी युवा गुणवत्ता आणि फिअरलेस खेळण्याची या युवा पिढीकडे असलेली वृत्ती. शिवाय या खेळाडूंबद्दल यजमान संघाला फारसं काही माहिती नसणं हेही आपल्या पथ्यावर पडू शकतं. अर्थात समोर ऑस्ट्रेलिया आहे. त्यामुळे कमिन्स, हेझलवूड आणि स्टार्कचे हात आपल्याला पहिल्या मॅचपासूनच बॅकफूटवर पाठवायला शिवशिवत असतील हे नक्की. त्याचवेळी शब्दयुद्धदेखील खेळलं जाणार. कारण, माईंड गेमचेही ते पक्के खिलाडी आहेत.

गोलंदाजीचा विचार केल्यास बुमराच्या रुपात गोलंदाजीतलं ब्रह्मास्त्र आपल्या ताफ्यात आहे. जी आपली विकेटची थाळी आहे. चेंडू नवा असो की जुना, प्रत्येक स्पेलला तो विकेटने आपलं पोट भरतो. कांगारुंच्या फलंदाजीला आपण सुरुवातीपासूनच वेसण घालायला हवी. वॉर्नरच्या अनुपस्थित हेड, ख्वाजा,  स्मिथ आणि लाबूशेन या चौघांवर कांगारुंची बॅटिंग अवलंबून आहे. अर्थात ही बॅटिंग लँगर, हेडन, पाँटिंग किंवा स्टीव्ह वॉ, मार्क वॉ इतकी मोठ्या दर्जाची नसली तरी स्मिथ, लाबूशेन आपल्या गोलंदाजीसमोर सातत्याने धावा करत आलेत. तर, हेडच्या बॅटचा तडाखा आपण वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये घेऊन पोळलोय. त्यामुळे या चौघांच्या खास करुन स्मिथला जितक्या लवकर आपण पॅव्हेलियनचं दार दाखवू, तितकं आपलं विजयाचं दार लवकर खुलं होईल. अटॅक इज अ बेस्ट वे ऑफ डिफेन्स. या सूत्रानेच ते खेळतील. तेव्हा जशास तसे उत्तर देण्यासाठीच आपल्याला शस्त्र परजावी लागतील. आपल्याला पहिल्या कसोटीत पहिलं सत्र, पहिला दिवस सामन्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. इथून पुढे आपण मग मालिका कंट्रोल करु शकू.  पर्थच्या या मैदानावर ऑस्ट्रेलियाने जे सामने जिंकलेत, त्यात प्रत्येक वेळी त्यांनी चारशे पार स्कोअर केलाय. त्यामुळे खेळपट्टी पहिल्या दोन दिवसात फलंदाजीला धार्जिणी असते. पुजारानेही हीच बाब अधोरेखित केली. तो म्हणाला, पहिली तीस षटकं तुम्ही खेळून काढलीत तर ३० ते ८० षटकांदरम्यान तुम्हाला धावा करता येतात. अर्थात असा संयमाचा महामेरु पुजारा या प्लेईंग इलेव्हनमध्ये नाहीये. तरी त्याच्या जागी सध्या पड्डिकलला ही जबाबदारी निभवायला लागेल. संयमी वृत्ती, थंड डोकं, आक्रमण आणि बचावाचा संगम साधत आपल्याला खेळायचंय. हा अग्नि'पर्थ' चालण्यासाठी भारतीय टीमला शुभेच्छा देऊया. कसोटी मालिका विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी पहिलं पाऊल टाकायचंय. स्वप्न साकारणं सध्या तरी महाकठीण वाटतंय. तरी क्रिकेट या खेळाचं अनप्रेडिक्टेबल नेचर पाहता या स्वप्नवत कामगिरीची अपेक्षा ठेवूया ना. तुम्हाला काय वाटतं?

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांना काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut : पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी - संजय राऊतAdani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांना काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Mahim Vidhan Sabha: माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
Embed widget