एक्स्प्लोर
'स्टुडंट ऑफ द ईअर 2' मध्ये नव्या, जान्हवी की सारा?

मुंबई : 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्टुडंट ऑफ द ईअर'चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिक्वेलमध्ये करण जोहरने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या या सिनेमात अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार असून नायिकेचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.
यापूर्वी शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर या सिनेमात लीड रोल करणार होता, पण आता टायगर श्रॉफच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. करण जोहरने ट्विटरवरुन अधिकृतरित्या हे नाव जाहीर केलं आहे.
https://twitter.com/karanjohar/status/765023947863777280
या सिनेमात टायगरसोबत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत असेल याबद्दल करणने मौन पाळलं आहे. पण या भूमिकेसाठी तीन नावांची चर्चा सुरु आहे. यात अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा, श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा खान यांच्या नावाची चर्चा आहे.
https://twitter.com/S1dharthM/status/765073004611117056
2012 मध्ये प्रदर्शित 'स्टुडंट ऑफ द ईअर'मधून सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि आलिया भट यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
नाशिक
बातम्या
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
