Taapsee Pannu: तापसीनं शेअर केलं नव्या चित्रपटाचं पोस्टर; म्हणाली, 'फिर आयी...'
नुकतेच 'हसीन दिलरुबा' (Haseen Dillruba) या चित्रपटाच्या सिक्वेलचे पोस्टर तापसीनं (Taapsee Pannu) सोशल मीडियावर शेअर केले.
![Taapsee Pannu: तापसीनं शेअर केलं नव्या चित्रपटाचं पोस्टर; म्हणाली, 'फिर आयी...' taapsee pannu share upcoming film phir aayi haseen dillruba poster on social media Taapsee Pannu: तापसीनं शेअर केलं नव्या चित्रपटाचं पोस्टर; म्हणाली, 'फिर आयी...'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/027f4210da4b9694d94aab1be66b15a91673485804206259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Taapsee Pannu: अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तापसीच्या आगामी चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात. 2021 मध्ये तापसीचा 'हसीन दिलरुबा (Haseen Dillruba) 'हा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच 'हसीन दिलरुबा' या चित्रपटाच्या सिक्वेलचे पोस्टर तापसीनं सोशल मीडियावर शेअर केले. या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
तापसीची पोस्ट
तापसीनं सोशल मीडियावर 'फिर आयी हसीन दिलरुबा' या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. पोस्टरमध्ये तापसी ही लाल रंगाची साडी, बॅकलेस ब्लाऊज अशा लूकमध्ये दिसत आहे. तिचे हात रक्तानं माखलेले आहेत. ती ताज महालच्या समोर बसलेली असते. या पोस्टरला तापसीनं कॅप्शन दिलं, 'एक नए शहर में फिर एक बार...तहलका मचाने आ रही है, हमारी हसीन दिलरुबा.' तापसीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तापसीनं शेअर केलेल्या पोस्टरला अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
रिपोर्टनुसार, 'फिर आयी हसीन दिलरुबा' या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
View this post on Instagram
'फिर आयी हसीन दिलरुबा' हा चित्रपट देखील पहिल्या भागा प्रमाणेच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल का? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळेल. 'हसीन दिलरुबा' या चित्रपटात विक्रांत मेस्सी, हर्षवर्धन राणे, आदित्य श्रीवास्तव या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)