एक्स्प्लोर

Gadad Andhar: 'गडद अंधार' मधील 'दरिया, दरिया...' गाणं प्रदर्शित; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

'गडद अंधार' या चित्रपटातील 'दरिया, दरिया...' (Dariya) हे गाणं रिलीज झालं आहे. एका अनोख्या विश्वाची सफर घडवणाऱ्या 'गडद अंधार' चित्रपटाची झलक 'दरिया, दरिया...' या गाण्यात पहायला मिळते.

Gadad Andhar: मराठीत पहिल्यांदाच एक वेगळा प्रयोग करण्यात येत असल्याने 'गडद अंधार' (Gadad Andhar) हा आगामी मराठी चित्रपट मागील बऱ्याच दिवसांपासून लाईमलाईटमध्ये आहे. या चित्रपटाची उत्सुकता टिझर रिलीज झाल्यापासून वाढली आहे. आता या चित्रपटातील नवं कोरं धमाकेदार गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. 'गडद अंधार' मधील 'दरिया, दरिया...' (Dariya) हे गाणं नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आलं आहे. टेक्निकली खूप दर्जेदार असलेल्या या सुमधूर गीतावर अल्पावधीत लाईक्सचा वर्षाव होत आहे. एका अनोख्या विश्वाची सफर घडवणाऱ्या 'गडद अंधार' चित्रपटाची झलक 'दरिया, दरिया...' या गाण्यात पहायला मिळते.

इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी 'गडद अंधार' या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'दरिया, दरिया...' हे गाणं गीतकार अभिषेक खणकर यांनी लिहिलं असून, गायक-संगीतकार रोहित श्याम राऊतनं स्वत:च गायलं आणि संगीतबद्धही केलं आहे.

निळाशार समुद्र, हिरवागार समुद्रकिनारा, नारळी-फोफळीच्या बागा, अफलातून एरिअल कॅमेरावर्क आणि पाण्याखालच्या विश्वाची झलक या गाण्यात अगदी अचूकणे सादर करण्यात आली आहे. अनुप साटम यांनी या गाण्यात केलेलं अप्रतिम गिटार वादन मनाला भिडते. चित्रपटाच्या टिझरप्रमाणे 'गडद अंधार'मधील 'दर्या...' हे गाणंही प्रेक्षकांना एका अनोख्या सफरीवर घेऊन जाणारं आहे. 

पाहा गाणं: 

सुमधूर गीत-संगीताच्या जोडीला दमदार स्टारकास्ट ही 'गडद अंधार' चित्रपटाची जमेची बाजू आहे. यात 'एमटिव्ही स्प्लिट्सव्हीला एक्स 3'चा विजेता तसंच 'बिग बॅास' फेम जय दुधाणे मुख्य भूमिकेत असून, त्याच्या साथीला अभिनेत्री नेहा महाजन आहे. याखेरीज शुभांगी तांबाळे, आकाश कुंभार आदी कलाकारांच्याही विविध भूमिका आहेत. प्रज्ञेश कदम यांनी लौकिक आणि चेतन मुळे यांच्या साथीनं चित्रपटाचं लेखन केलं आहे. झिटारवादन भगिरथ भट यांनी केलं असून, जुईली जोगळेकर राऊत आणि आदिनाथ पाटकर यांनी बॅकिंग व्होकल्स दिले आहेत. या चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्डिंग आणि मास्टरचे काम विनायक पवार यांनी साऊंडआयडियाज स्टुडिओजमध्ये केलं आहे. आदिनाथ पातकर यांनी गाण्याची व्यवस्था केली असून, या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते प्रवीण वानखेडे आहेत. सुपर नॅचरल थ्रीलर 'गडद अंधार' 3 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Gadad Andhar Teaser: पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार'; टीझर प्रदर्शित

महत्त्वाच्या बातम्या

Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
CM Yogi Adityanath On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Embed widget