एक्स्प्लोर

Hardik Pandya : 'आपण आपल्या खेळाडूंचा आदर करायलाच हवा', हार्दीक पांड्यासाठी बॉलीवूड अभिनेत्याची खास पोस्ट चर्चेत

Bollywood Actor Post for Hardik Pandya : हार्दीक पांड्याच्या कर्णधार पदावर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांकडून बरीच नाराजी व्यक्त केली जातेय. त्यावर बॉलीवूड अभिनेत्याने भाष्य केलं आहे.

Sonu Sood Post for Hardik Pandya : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा त्याच्या अभिनयानमुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या सामाजिक कार्यामुळेही तो कायमच फ्रंटवर असतो. कोविड काळात त्याने केलेल्या कामाचं विशेष कौतुक झालं. पण हा अभिनेता सध्या एका वेगळा कारणामुळे चर्चेत आला आहे. आयपीएल 2024 (IPL 2024) चा हंगाम सुरु झाला आहे. पण या हंगमात मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद हार्दीक पांड्याकडे (Hardik Pandya) देण्यात आलं आहे. यामुळे मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांमध्ये बरीच नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. त्याच वादावर सोनू सूद याने प्रतिक्रिया दिली आहे. 

आयपीएलच्या हंगामात मुंबईने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. मुंबईचा पहिला समाना हा हार्दीक पांड्याने आधी ज्या संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली होती, त्या गुजरात सोबत झाला आणि दुसरा हैदराबादसोबत. पण या दोन्ही सामन्यात मुंबईला पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे हार्दीक पांड्याच्या कर्णधार पदावर बरीच नाराजी व्यक्त केली जातेय. सोशल मीडियावरही हार्दीकला बरंच ट्रोल देखील करत असल्याचं पाहायला मिळतंय. याच सगळ्यावर सोनू सूदने भाष्य केलं आहे. 

सोनू सूदने नेमकं काय म्हटलं?

सोनूने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत यावर सगळ्यावर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, आपण आपल्या खेळाडूंचा आदर करायलाच हवा. हेच खेळाडू आपल्याला,  आपल्या देशाला कायमच अभिमान वाटावा असं करतात. एक दिवस तुम्ही त्यांना चिअर करत तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना नावं ठेवता. त्यामुळे ते कुठेही फेल होत नाहीत, तर यामध्ये आपण फेल होतो. मला क्रिकेट खूप आवडतं. जो माझ्या देशाचं प्रतिनिधीत्व करतो तो प्रत्येक खेळाडू मला खूप आवडतो. त्यामुळे तो कोणत्या फ्रेंचायझीसाठी खेळत आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. त्याचप्रमाणे तो संघाचा कर्णधार म्हणून खेळत आहे की तो संघातला 15 वा खेळाडू म्हणून खेळत आहे, यानेही फरक पडत नाही. ते आपले हिरो आहेत. 

सोनू सूदच्या कामाविषयी

सोनू सूदचा फेतह हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनू मुख्य भूमिकेत असून त्याने या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. तसेच त्याचा पृथ्वीराज हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटामधून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो. सोनूनं आत्तापर्यंत 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ही बातमी वाचा : 

Amitabh Bachchan First Love : रेखा अन् जया बच्चन नव्हे; 'या' महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात वेडे होते अमिताभ बच्चन; मित्रानेच केली पोलखोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST Bus : एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
Gulabrao Patil : महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh News | माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि भावाची काळजी घे,संतोष देशमुखांनी मृत्यूपूर्वी दिला होता लेकीला सल्लाSatish Bhosale Home Raid | सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी छाप्यात सापडलं शिकारीचं घबाड, धारदार शस्त्र, जाळी, आणि बरंच काही..Rohini Khadse Letter to Presidentअत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा खून करायचाय:रोहिणी खडसेBurhanpur Gold coins : Chhaaava पाहून खोदकाम, सोन्याचे शिक्के मिळवण्यासाठी धावाधाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Bus : एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
Gulabrao Patil : महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
मोठी बातमी : खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
Jonty Rhodes Catch Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
International Women's Day 2025 : केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलचा मानकरी कोण?
गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलचा मानकरी कोण?
Embed widget