Amitabh Bachchan First Love : रेखा अन् जया बच्चन नव्हे; 'या' महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात वेडे होते अमिताभ बच्चन; मित्रानेच केली पोलखोल
Amitabh Bachchan First Love : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. तसेच अमिताभ आणि रेखा (Rekha) यांच्या अफेअरच्याही अनेक चर्चा आहेत. रेखा आणि जया बच्चन यांच्याआधी अमिताभ बच्चन एका महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात वेडे झाले होते.
Amitabh Bachchan First Love : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. बिग बी आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांची फिल्मी लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. तसेच अभिनेत्री रेखा (Rekha) आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरचेही अनेक किस्से आहेत. रेखा आणि जया बच्चन यांच्याआधी अमिताभ बच्चन एका महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात वेडे झाले होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. अनेक वर्षांनंतर बिग बींच्या एका मित्राने याची पोलखोल केली आहे.
अमिताभ बच्चन यांचं पहिलं प्रेम (Amitabh Bachchan First Love)
अमिताभ बच्चन काही काळ कोलकातामध्ये राहायला होते. कोलकातामध्ये राहत असताना अमिताभ बच्चन एका मुलीच्या प्रेमात वेडे झाले होते. ही मुलगी म्हणजे अमिताभ बच्चन यांचं पहिलं प्रेम होतं. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटिश कंपनी आईसीआई (ICI) मध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात अमिताभ बच्चन वेडे झाले होते. अमिताभ बच्चन आणि ती मुलगी तेव्हा कोलकातामध्ये नोकरी करत होती.
बिग बींच्या मित्राने केला खुलासा
अमिताभ बच्चन यांचा खास मित्र दिनेश कुमारने मुलाखतीत सांगितलं की,"कोलकातामध्ये राहत असताना अमिताभ बच्चन यांना एका महाराष्ट्रीय मुलीने आपल्या प्रेमात पाडलं होतं. त्यावेळी अमिताभ बच्चन यांना 1500 रुपये आणि त्या मुलीला 400 रुपये महिन्याला पगार मिळत होता. अमिताभ बच्चन यांना त्या मुलासोबत लग्न करायचं होतं. पण गोष्टी पुढे न गेल्याने बिग बी यांनी ती नोकरी आणि कोलकाता दोन्ही सोडलं आणि मुंबई गाठली. त्यामुळे त्यांचा 26 दिवसांचा पगार कापला होता".
मित्र पुढे म्हणाला की,"अमिताभ बच्चन ज्या मुलीच्या प्रेमात वेडे झाले होते त्या मुलीने पुढे बंगाली सिनेमांतील एका लोकप्रिय अभिनेत्यासोबत संसार थाटला. मी आणि बिग बी तीन वर्षे ब्लैकर अँड कंपनीमध्ये काम करत होतो. बंगली अभिनेत्यामुळे त्या मुलीने बिग बींना नकार दिला नव्हता. तर काही कौटुंबिक कारणांमुळे तिला बिग बींसोबत लग्न करता आले नाही".
बिग बी आणि महाराष्ट्रीय मुलगी अनेक दिवस रिलेशनमध्ये होते. त्यांची पहिली भेट कोलकातामधील एका नाटकादरम्यान झाली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. पण त्यांना लग्न मात्र करता आलं नाही. 1968 मध्ये महाराष्ट्रीयन मुलीने बिग बींना लग्नासाठी आपला नकार कळवला. त्या ब्रेकअपनंतर बिग बिंना मोठा धक्का बसला होता.
संबंधित बातम्या