Salman Khan : 'भाईजान'चे बॅक टू बॅक 10 चित्रपट फ्लॉप, या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे सलमान खानचं नशीब पालटलं आयुष्य; अभिनयाने जिंकली चाहत्यांची मने
Salman Khan Movies : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या आयुष्यात एक असा काळ होता, जेव्हा त्याचे एका मागोमाग एक 10 चित्रपट फ्लॉप ठरले होते.
मुंबई : बॉलिवूडचा 'दबंग' अर्थात सलमान खानचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. भाईजान सलमान खान बॉलिवूडमध्ये अनेकांसाठी गॉडफादर ठरला आहे. त्याने अनेकांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवून दिलं आहे. अभिनेता सलमान खानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करतात. कमाईच्या बाबतील सलमान खानच्या चित्रपटांच्या नावांवर अनेक विक्रम आहे. सलमान खानने एकामागोमाग एक अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तुम्हाला माहित आहे की, एक काळ असा होता जेव्हा सलमान खानचे बॅक टू बॅक 10 चित्रपट फ्लॉप ठरले होते.
जेव्हा सलमान खानचे सलग 10 चित्रपट ठरले होते फ्लॉप
बॉलिवूड सूपरस्टार सलमान खान याने बजरंगी भाईजान, टायगर, वाँटेड आणि दबंग यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. प्रत्येक कलाकाराच्या करिअरमध्ये चढ-उतार येत असतात. तसेच, सलमान खानच्या आयुष्यातही अनेक चढ-उतार आले. 2000 ते 2003 या काळात सलमान खानची बॉक्स ऑफिसवरील जादू चाललीच नाही. सलमान खानच्या कारकिर्दीत एक वेळ अशी आली जेव्हा त्याने 10 फ्लॉप चित्रपट दिले. पण 11 व्या चित्रपटाने त्याचं नशीब पालटलं.
अभिनयाने जिंकली चाहत्यांची मने
1999 मध्ये आलेला सलमान खानचा 'हम साथ साथ है' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. मात्र त्या चित्रपटानंतर भाईजानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोणतीही जादू करू शकले नाहीत. भाईजानचे एकामागून एक 10 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. पण काळ बदलला आणि भाईजानला एक चित्रपट मिळाला ज्याने त्याच्या करिअरची दिशा बदलली.
'या' चित्रपटामुळे पालटलं नशीब
सलमान खानचा 2003 मध्ये आलेला तेरे नाम चित्रपट त्याच्यासाठी लकी ठरला. 'तेरे नाम' हा चित्रपट सलमान खानच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटातील जबरदस्त अभिनय आणि संस्मरणीय कथेने सलमान खानच्या अभिनय कौशल्याचा एक नवीन पैलू प्रेक्षकांसमोर आला. या चित्रपटातील सलमानच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर एक मजबूत छाप सोडली. तेरे नाम चित्रपटाची कथा लेखक बालाच्या मित्राच्या जीवनातील सत्य घटनेपासून प्रेरित आहे. हा 1999 च्या तमिळ हिट सेतूचा रिमेक होता. तेरे नाम चित्रपटाच्या रिलीजला आता 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाची गाणी आजही अनेकांच्या ह्रदयात घर करुन आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :