एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणला सेलिब्रिटींचा फुल सपोर्ट, 'गुलिगत किंग'साठी जय दुधाणे, उत्कर्ष शिंदेची खास पोस्ट

Bigg Boss Marathi 5 : निर्माते संदीप सिकंद, अभिनेते पुष्कर जोग, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे यांनी सूरज चव्हाणचं तोंडभरून कौतुक केलं.

Bigg Boss Marathi Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या घरात अरबाज पटेल नवीन कॅप्टन झाला आहे. टास्क जिंकून अरबाज घरचा कॅप्टन बनला असला, तरी खरी चर्चा सूरज चव्हाणची आहे. सूरज चव्हाणने कॅप्टन्सी टास्कमध्ये जान्हवी, निक्की, धनश्या:मसोबत अरबाजला चांगलंच शिंगावर घेतलं. सूरज चव्हाण कॅप्टन्सी टास्कमध्ये या चौघांना एकटा भिडला. सूरजचा हा अंदाज प्रेक्षकांच्या फारच पसंतीस उतरला आहे. सूरज चव्हाणचं सेलिब्रिटींनीही तोंड भरुन कौतुक केलं आहे.

गुलिगत किंगला सेलिब्रिटींचा फुल्ल सपोर्ट

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 5) कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरज चव्हाण (Suraj Chavan) विरुद्ध अरबाज, जान्हवी, निक्की, धनश्या:म असं चित्र पाहायला मिळालं. या टास्कमध्ये सूरजने चांगलाच कल्ला केल्याचं दिसून आलं. एवढंच काय तर सूरजवर दादागिरी करणाऱ्या वैभवलाही सूरजने "मी माझं बघेन", असं सांगत गप्प केलं. कॅप्टन्सी टास्कमधील सूरज सर्वांना एकटा भिडला. सूरज टास्क जिंकला नसला, तरी सूरज वन मॅन आर्मी असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. 

'सूरज चव्हाण बेस्ट आहे, तू भीड मित्रा, लढ भावा...'

सेलिब्रिटींनीही सूरज चव्हाणचं कौतुक केलं आहे. निर्माते संदीप सिकंद (Sandiip Sikcand), अभिनेते पुष्कर जोग (Pushkar Jog), उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde), जय दुधाणे (Jay Dudhane) यांनी सूरज चव्हाणच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणला सेलिब्रिटींचा फुल सपोर्ट, 'गुलिगत किंग'साठी जय दुधाणे, उत्कर्ष शिंदेची खास पोस्ट

अभिनेता आणि बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक जय दुधाणे याने सोशल मीडियावर सूरजसाठी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हटलंय, "लव्ह यू सूरज भावा... असंच खेळत राहा... लढ भावा".

View this post on Instagram
 
A post shared by Sandiip Sikcand (@sandiipsikcand)

अभिनेता पुष्कर जोगने सूरज आणि योगिता चव्हाण यांचं कौतुक करत लिहिलंय की, "चल सूरज... तू भीड मित्रा... योगिता चव्हाण तग धरुन राहा.. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत".

View this post on Instagram
 
A post shared by Pushkar Surekha Suhas Jog (@jogpushkar)

बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक आणि गायक उत्कर्ष शिंदे याने म्हटलंय, "निक्की, जान्हवी, अरबाज 1, अरबाज 2 काय घाबरले राव. सूरज आज तुझ्या हिंमतीच्या समोर बाकी सर्व पानीकम चाय वाटले. #शिंदेशाहीसलाम."

View this post on Instagram
 
A post shared by Endemol Shine India (@endemolshineind)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : निक्की आणि जान्हवीच्या डोळ्यात पहिल्यांदा भीती दिसली, अब आएगा मजा...; सूरजचा रुद्रावतार पाहून नेटकरी खूश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Case : तीन दिवसांनी बनवलेला शवविच्छेदन अहवाल खोटा, दिशाच्या वडिलांचा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 27 March 2025Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, तीन आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली; आरोपी घुले काय म्हणाला?Job Majha : बँक ऑफ बडोदा नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती? 27 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
Embed widget