Ramayan : रामायणापासून राजकारणापर्यंत सीता रामजींच्या स्पर्धेत नाहीच; खासदार झाली अन् संपत्तीत सुद्धा पुढेच!
Dipika Chikhlia on Ramayan : 'रामायण' या मालिकेच्या माध्यमातून दीपिका चिखलिया आणि अरुण गोविल (Arun Govil) घराघरांत पोहोचले. पण संपत्ती, प्रसिद्धी आणि रायकीय प्रवासात मात्र दीपिका चिखलिया अरुण गोविल यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत.
![Ramayan : रामायणापासून राजकारणापर्यंत सीता रामजींच्या स्पर्धेत नाहीच; खासदार झाली अन् संपत्तीत सुद्धा पुढेच! Ramayan Actor Arun Govil Dipika Chikhlia Net Worth TV Show Political Career BJP Maharashtra Potitics Marathi News Ramayan : रामायणापासून राजकारणापर्यंत सीता रामजींच्या स्पर्धेत नाहीच; खासदार झाली अन् संपत्तीत सुद्धा पुढेच!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/01/b4fcab10491a225965d91e18e9884acb1711982831704254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ramayan Dipika Chikhlia Net Worth : देशात 'लोकसभा निवडणूक 2024'चं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. नेहमीप्रमाणे यंदादेखील वेगवेगळ्या पक्षांनी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या मंडळींना उमेदवारी जाहीर केली आहे. यासगळ्या बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि 'रामायण' (Ramayan) फेम अरुण गोविल (Arun Govil) यांची सर्वाधिक चर्चा आहे. दोघांनाही भाजपने (BJP) उमेदवारी दिली आहे. कंगना रनौत हिमाचलमधील मंडी तर अरुण गोविल मेरठमधून निवडणूक लढवणार आहेत. 'रामायण' या मालिकेत प्रभू राम यांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्याआधी याच मालिकेत रावण आणि सीता मातेच्या भूमिकेत दिसणारे दिवंगत अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) आणि दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) यांनी लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत पोहोचले आहेत.
संपत्ती आणि प्रसिद्धीच्या बाबतीत 'रामायण' मालिकेतील सीता म्हणजेच दीपिका चिखलिया अरुण गोविल यांच्यापेक्षा पुढेच आहे. 40 वर्षांपूर्वी 'रामायण' मालिकेत सीता मातेची भूमिका साकारुन दीपिका चिखलिया यांनी फक्त लोकप्रियताच मिळवली नाही तर चांगले पैसेदेखील कमावले.
दीपिका चिखलिया यांची संपत्ती किती? (Dipika Chikhlia Net Worth)
दीपिका चिखलिया यांनी 'रामायण' या सुपरहिट मालिकेनंतर अनेक मालिका आणि सिनेमांत काम केलं. दीपिका चिखलिया यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1983 मध्ये 'सुन मेरी लैला' या सिनेमाच्या माध्यमातून केली. पुढे 'रामायण' या मालिकेत साकारलेल्या सीता मातेच्या माध्यमातून त्या घराघरांत पोहोचल्या. सीता मातेची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. दीपिका चिखलिया यांना 'रामायण' मालिकेच्या माध्यमातून तब्बल 20 लाख रुपये मानधन मिळालं. दीपिका चिखलिया यांची एकूण संपत्ती 38 कोटींच्या आसपास आहे. तर अरुण गोविल यांची एकूण संपत्तीदेखील 38 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे संपत्तीच्या बाबतीत दीपिका चिखलिया अरुण गोविल यांना टक्कर देताना दिसून येतात.
निवडणूक लढवलेल्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia Political Career)
अरुण गोविल यांच्याआधी दीपिका चिखलिया यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. टेलिव्हिजन आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. दीपिका यांनी 1991 मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे बडोदा मतदारसंघातून निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आणि लोकसभेच्या खासदार झाल्या. दीपिका यांच्यासह 'रामायण' मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे दिवंगत अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनीदेखील भाजपकडून साबरकांठा येथून निवडणूक लढवली होती. दीपिका चिखलिया यांचे रुपये दस करोड, घर का चिराग आणि खुदाई हे चित्रपट चांगलेच गाजले होते. हिंदी चित्रपटांसह मल्याळम, कन्नड, तामिळ आणि बंगाली या चित्रपटांतही काम केलं आहे.
संबंधित बातम्या
Arun Govil : रामायणातील 'राम' किती धनवान? निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अरुण गोविलांकडे किती संपत्ती?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)