Nikita Rawal : अभिनेत्री निकिता रावलच्या घरी चोरी; बंदूक अन् चाकूचा धाक दाखवत लाखोंची रोकड आणि दागिने घेऊन नोकर लंपास
Nikita Rawal : अभिनेत्री निकिता रावलच्या घरी चोरी झाली आहे.

Nikita Rawal : 'गरम मसाला' आणि 'ब्लॅक अॅन्ड व्हाइट' या सिनेमात झळकलेली अभिनेत्री निकिता रावलच्या (Nikita Rawal) घरी चोरी झाली आहे. बंदुक आणि चाकूचा धाक दाखवत घरातील नोकरानेच चोरी केली आहे. लाखो रुपये आणि दागिने घेऊन नोकर लंपास झाला आहे. याप्रकरणी अभिनेत्रीने आता मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
निकिताने मुंबईतील मालाड येथील बांगुर नरग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दैनिक भास्करला या प्रकरणाची माहिती देत अभिनेत्री म्हणाली,"माझ्याच घरातील नोकराने चोरी केली यावर माझा विश्वास बसत नाही. मला त्याने बंदुकीचा धाक दाखवला. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली".
लाखोंची रोकड आणि दागिने घेऊन लंपास
निकिता म्हणाली की,"घरातील नोकराने सुमारे साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम, काही सोन्याचे दागिने आणि प्लॅटिनची अंगठी चोरी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो चोरी करत आहे. याआधी त्याने 10-15 हजार रुपये चोरले आहेत. दरोडेखोरांनी माझी 3 लाख 80 हजार रुपयांची अंगठी हिसकावून घेतली आहे. याआधी मी नोकराला चोरी करताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर त्याने हाणामारी सुरू केली".
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण घटनेमागे घरातील नोकराचा हात आहे. प्रमोद नामक आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मुंबईत राहणाऱ्या निकिता रावलने 2010 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. याआधीदेखील निकितासोबत एक प्रसंग घडला होता. सप्टेंबरमध्ये दिल्लीतील काही गुंडांनी बंदुकीचा धाक दाखवत तिच्याजवळील 7 लाख रुपयांच्या वस्तू लुटल्या होत्या.
View this post on Instagram
निकिता रावलबद्दल जाणून घ्या... (Who is Nikita Rawal)
निकिता रावलने 2010 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले. मिस्टर हॉट मिस्टर कूल, ब्लॅक अॅन्ड व्हाइट, द हिरो-अभिमन्यू, अम्मा की बोली या कलाकृतींमध्ये निकिता रावल झळकली आहे. 'गरम मसाला' या सिनेमामुळे निकिता चांगलीच लोकप्रिय झाली. आजवर निकिताने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. मिस्टर हॉट मिस्टर कूल आणि गरम मसाला सारख्या सिनेमांतील अभिनयासाठी निकिताचं कौतुक झालं आहे. अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या
Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
