69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा, अल्लू अर्जुन, आलिया भट्टसह अनेक कलाकारांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
PVR INOX Monthly Subscription Pass: सिनेप्रेमींसाठी खुशखबर! PVR INOX ने केली पासची घोषणा, दहा चित्रपट पाहा एकाच पासमध्ये; जाणून घ्या पासची किंमत
PVR INOX Monthly Subscription Pass: कोरोनाकाळात अनेक लोक ओटीटीवर (Ott) चित्रपट बघत होते. कोरोनानंतर प्रेक्षकांना पुन्हा थिएटरमध्ये खेचून आणणे हे मल्टीप्लेक्सच्या मालकांसाठी आणि चित्रपट निर्मात्यांसाठी चॅलेंज होते. पण कोरोनानंतर विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. ते पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. काही मल्टीप्लेक्स कंपन्यांनी चित्रपटाच्या तिकिटांच्या किंमतींवर ऑफर्स देण्यात सुरुवात केली. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त देखील प्रेक्षकांना 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. आता PVR INOX ने सिनेप्रेमींसाठी एका खास पासची घोषणा केली आहे.
Kangana Ranaut: 'इमर्जन्सी'ची रिलीज डेट ढकलली पुढे; कंगना ट्वीट करत म्हणाली, "रिलीज डेट जाहीर केली होती पण..."
Kangana Ranaut Emergency Postponed: अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) इमर्जन्सी (Emergency) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात कंगना ही इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. कंगनानं या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर केली होती. पण आता इमर्जन्सी या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. कंगनानं इमर्जन्सी या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्याचं कारण सांगितलं आहे.
Sherika De Armas Died: माजी मिस वर्ल्ड स्पर्धक शेरिका डी अरमासचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी
Sherika De Armas Died: माजी मिस वर्ल्ड स्पर्धक शेरिका डी अरमासचे (Sherika De Armas) निधन झाले. तिने 2015 मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत उरुग्वेचे (Uruguay) प्रतिनिधित्व केले होते. एका रिपोर्टनुसार, शेरिका डी अरमास ही गेल्या काही दिवसांपासून गर्भाशयाच्या कर्करोगाशी झुंज देत होती. शेरिकानं केमोथेरपी आणि रेडिओथेरपी उपचार देखील घेतले होते. पण 13 ऑक्टोबर रोजी वयाच्या 26 व्या वर्षी शेरिकानं अखेरचा श्वास घेतला आहे.
Aatmapamphlet Marathi Movie : "अंथरुणाच्या बाहेर पाय पसरता येत नाहीत"; ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या दिग्दर्शकाची पोस्ट; म्हणाला, "शेवटी मराठी सिनेमा आणि..."
Aatmapamphlet Marathi Movie: आत्मपॅम्फ्लेट (Aatmapamphlet) या मराठी चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाच्या कथानकाचं आणि या चित्रपटामधील कलाकारांचे कौतुक केले. पण आता आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाचा दिग्दर्शक आशिष बेंडे (Ashish Bende) यानं फेसबुकवर पोस्ट शेअर करुन एक खंत व्यक्त केली आहे. त्याच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
Kiran Mane: "सेक्समध्ये स्त्रियांच्या लैंगिक सुखालाही समान महत्त्व..."; किरण मानेंनी शेअर केली 'थँक्यू फॉर कमिंग' चित्रपटाबद्दल खास पोस्ट
Kiran Mane: 'थँक्यू यू फॉर कमिंग' (Thank You For Coming) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी काही प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. भूमी पेडणेकर, शहनाज गिल, कुशा कपिला या अभिनेत्रींनी या चित्रपटात काम केलं आहे. अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी नुकतीच थँक्यू फॉर कमिंग या चित्रपटाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून किरण माने यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
View this post on Instagram
69th National Film Awards: दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना वहीदा रेहमान झाल्या भावूक; म्हणाल्या, "हा पुरस्कार..."
69th National Film Awards: ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान (Waheeda Rehman) यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ( National Film Awards) दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Award) जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते वहीदा रेहमान यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वहीदा रेहमान या भावूक झाल्या.
#WATCH | Delhi | "...very honoured, very humbled..," says veteran actress Waheeda Rehman as she receives the Dadasaheb Phalke Lifetime Achievement Award. pic.twitter.com/RY02EDKyGI
— ANI (@ANI) October 17, 2023
69th National Film Awards Live Updates : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला सुरुवात
69th National Film Awards Live Updates : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
69th National Film Awards Live Updates : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला सुरुवात
69th National Film Awards Live Updates : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे.