Malaika Arora : बॉलीवूडची 'मुन्नी' कोट्यवधींची मालकीण, मलायकाने तीन वर्षांसाठी पुन्हा एक घर दिलं भाड्याने; महिन्याचं घरभाडं ऐकून व्हाल थक्क
Malaika Arora : बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने तिचं घर भाड्याने दिलं असून त्याचं महिन्याचं भाडं हे 1 लाखांपेक्षा जास्त असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
Malaika Arora : बॉलीवूड अभिनेत्री मलायकाने अरोराने (Malaika Arora) तिच्या वांद्र्यातील अपार्टमेंटला भाड्याने दिल्याची माहिती सध्या समोर येत आहे. डिझायन कशिश हंसला मलायकाने तिचं घर भाड्याने दिलं आहे. तीन वर्षांसाठी तिने हे घर दिलं असून त्याचं महिन्याचं भाडं हे जवळपास 1 लाख 57 हजार रुपये इतकं आहे. अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या बरीच चर्चेत असते. त्यातच आता तिच्या घरामुळे मलायका पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय.
हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, मलायकाचं हे घर वांद्रे पश्चिम येथील पाली हिल परिसरात आहे. हे घर तिने तीन वर्षांसाठी भाड्याने दिलं आहे. तसेच या घराचं महिन्याचं भाडं हे जवळपास 1 लाख 57 हजार रुपये इतकं आहे.त्याचप्रमाणे करारानुसार, दर महिन्याला या घराचं भाडं हे 5 टक्क्यांनी वाढेल, असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे या तीन वर्षात कशिला पहिल्या वर्षी दर महिन्याला 1 लाख 5 हजार, दुसऱ्या महिन्याला 1 लाख 57 आणि तिसऱ्या वर्षाला 1 लाख 65 हजार रुपये महिन्याला भाडं द्यायचं आहे.
4 लाख 50 हजारांचे दिले डिपॉझीट
दरम्यान 29 एप्रिल रोजी या घराचा व्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार, तिसऱ्या वर्षाच्या अखेरपर्यंत कशिश हंस 1 लाख 65 हजार रुपये भाडं भरणार आहे. त्याचप्रमाणे 4 लाख 50 हजार सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यानंतर हे घर भाड्याने घेण्यात आल्याची माहिती हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार देण्यात आलीये. परंतु मलायकाने यासंदर्भात अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही. याआधी देखील मलायकने तिचे वांद्र्यातील एक घर भाड्याने दिले होते. या घराच देखील जवळपास 1 लाख 20 हजार रुपये भाडं आकारण्यात आल्याची माहिती देण्यात आलीये. जेफ गोल्डनबर्ग स्टुडिओचे मालक जेफ्री गोल्डनबर्ग यांनी हे घर भाड्याने घेतले.
'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली.मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. मलायका आणि अरबाज यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव अरहान खान आहे. काही दिवसांपूर्वी अरबाजनं शूरा खानसोबत लग्न केलं. तर मलायका ही अर्जुनसोबत कधी लग्न करणार? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
ही बातमी वाचा :
Kiran Mane : मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...