एक्स्प्लोर

Kiran Mane :  मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...

Kiran Mane :  आपल्या परखड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता किरण माने याने मराठी सिनेसृष्टीतील लॉबीबद्दल मत व्यक्त केले आहे.

Kiran Mane :  मराठी सिनेसृष्टीत लॉबी, गटबाजी असल्याचा नेहमी आरोप-दावा केला जातो. काही कलाकार दबक्या आवाजात या गटबाजीची कबुली देतात. तर, काही कलाकार नकार देतात. आपल्या परखड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता किरण माने (Kiran Mane) याने मराठी सिनेसृष्टीतील लॉबीबद्दल मत व्यक्त केले आहे. मराठीत लॉबी नाही तर छोट्या-छोट्या गटांचे डबकं असल्याचे वक्तव्य किरण माने यांनी एका मुलाखतीत केले. 

किरण माने यांनी कॉकटेल स्टुडिओ या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मराठी सिनेसृष्टीतील गटबाजी भाष्य केले. किरण मानेने सांगितले की,  मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप छोटे छोटे गट आहे. त्याला मी रागाने डबके म्हणतो. यातील लोक हे एकमेकांनाच हे लोक काम देतात. एखाद्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात तेच-तेच कलाकार दिसतात. मुलाखतींमध्ये एकमेकांना मोठं करतात. एकमेकांना उचलून धरत असल्याचे किरण माने यांनी दावा केला. 

मराठी सिनेसृष्टीत कामे देताना योग्य कलाकारापेक्षा आपल्या जवळच्या मित्राला, अभिनेता-अभिनेत्रींना काम दिले जाते. त्यामुळे गुणवत्ता असूनही उपयोग झाला नाही. 

म्हणून सकस कलाकृती होत नाहीत... 

किरण माने यांनी आपल्या मुलाखतीत पुढे म्हटले की, मराठीत सकस कलाकृती फार कमी होतात असे म्हटले जाते, त्याची चर्चा होते. जागतिक दर्जाच्या कलाकृती मराठीत का होत नाही? चित्रपट म्हणा, नाटके म्हणा काहीही दर्जेदार का होत  नाही. बाहेरच्या देशातील कलाकृतींवर इकडे चित्रपट होतात. आपलं म्हणून का दर्जेदार कलाकृती तयार होत नाही असा प्रश्नही किरण मान याने विचारला. 

आपल्याकडे नितळ मनाने व्यापकदृष्टीकोणाने काही केले जात नाही. त्यामुळे या मागील सात-आठ वर्षात किती मराठी चित्रपट चालले? तर, त्यांची संख्या खूप कमी चित्रपट चालले असे याकडे किरण माने यांनी लक्ष वेधले. 

तेच तेच कलाकार

मराठी सिनेसृष्टीत ज्यांच्या नावावर चित्रपटगृहात गर्दी होईल असे एकही अभिनेता, अभिनेत्री नाही. तरीदेखील तेच-तेच कलाकार चित्रपटात दिसत असतात. इतर कलाकारांना संधीच दिले जात नसल्याचे किरण माने सांगितले. 

काही बायोपिकची माती...

मराठी चित्रपटसृष्टीत मागील काही वर्षात चरित्रपट (बायोपिक)  आले. यावरही भाष्य करताना किरण मानेने सांगितले की,  मराठीत आलेल्या बायोपिकमध्ये काही कलाकारांनी माती केली आहे. योग्य कलाकारांची निवड न केल्याने चित्रपटाची माती झाली असल्याचा आरोप किरण मानेने केला. त्या बायोपिकमध्ये कलाकाराची भूमिका लोकांना आवडली नाही. पण, काही गोष्टी मॅनेज करून कलाकाराचे कौतुक केले जात होते असेही किरण मानेने म्हटले. 

इतर संबंधित बातमी :

श्रीकांत भोसले
Read More

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Embed widget