TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'पोटरा' सिनेमाची बाजी
'पोटरा' सिनेमाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'संत तुकाराम' हा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शंकर धोत्रे यांनी केले आहे. तर नटराज एंटरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाने जागतिक वारीदेखील केली आहे. वर्ल्ड फिल्म कार्निव्हल-सिंगापूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये शंकर धोत्रे यांना पदार्पणातला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला होता. 'पोटरा' सिनेमा ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक स्थितीवर भाष्य करतो.
मोगामधून सोनू सूदची बहीण मालविका पिछाडीवर!
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद मोगा मतदारसंघातून सध्या पिछाडीवर आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपर्यंत ती तिसऱ्या क्रमांकावर होती. आम आदमी पक्षाच्या उमेदवार डॉ.अमनदीप कौर पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, अकाली दलाचे बरजिंदर सिंह ब्रार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मोगा ही पंजाबमधील हायप्रोफाईल जागांपैकी एक असून, चित्रपट अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद निवडणूक रिंगणात उतरली आहे. काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेली मालविका सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पिछाडीवर आहे.
'कौन प्रवीण तांबे'चा ट्रेलर रिलीज
बॉलिवूडमध्ये सध्या क्रिकेटपटूंवर बायोपिक बनवण्यात येत आहेत. महेंद्रसिंह धोनी, कपिल देवनंतर आता प्रवीण तांबेचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कौन प्रवीण तांबे' असे या सिनेमाचा नाव आहे. क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'जलसा'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. कहानी असो वा शेरनी विद्याच्या प्रत्येक चित्रपटाला तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. तिच्या जलसा या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत आहे.
शरद पोंक्षे यांचं 'राष्ट्राय स्वाहा' हे नवं यू ट्यूब चॅनेल प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी चित्रपट, नाटक, मालिका या सगळ्यांमध्ये ज्यांनी आपल्या अभिनयाद्वारे कामाचा ठसा उमटवला आहे ते म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे. शरद पोंक्षे यांनी आता एक यू ट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. या यू ट्यूब चॅनेलचं नाव 'राष्ट्राय स्वाहा' असं आहे. या नवीन चॅनेलच्या माध्यमातून शरद पोंक्षे हे राष्ट्रपुरुष आणि संतांचे विचार तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेत. नुकतंच त्यांनी या संदर्भात ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. तसेच, या नवीन प्रोजेक्टचा पहिला एपिसोड त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Short Movies : डिज्नी प्लस हॉस्टारवर मनोरंजनाची मेजवानी; एकही रूपया खर्च न करता पाहा या शॉर्ट फिल्म्स
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' मध्ये आलियाला पाहिल्यानंतर पूजा भट म्हणाली, 'आता ती...'
Riteish Deshmukh On Jhund : रितेश देशमुखनं झुंडचं केलं कौतुक; म्हाणाला, 'नागराज मंजुळे हा देशातील...'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha