एक्स्प्लोर

ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट

Dhurandhar 2 Trailer to Drop on March 7: धुरंधर 2 चित्रपटाचा ट्रेलर 7 मार्च रोजी रिलीज होणार आहे.

Dhurandhar 2 The Revenge trailer release date: ब्लॉकबस्टर धुरंधर हा चित्रपट आता दुसऱ्या भागासह परतण्यासाठी सज्ज आहे.  धुरंधरच्या पहिल्या भागात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल यांसह इतर कलाकारांची भूमिका लक्षवेधी ठरली. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारांनी आपल्या भूमिकांना न्याय दिला.  या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा धुवांधार टीझर रिलीज झाला. या टीझरला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.  दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर नेमकं कधी रिलीज होणार?  असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.  धुरंधर हा चित्रपट 19 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. सध्या ट्रेलरच्या प्रतिक्षेत प्रत्येक प्रेक्षक आहे. दरम्यान, या चित्रपटाविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. रणवीर सिंहने आपल्या पोस्टमधून ट्रेलरच्या प्रदर्शनाची  तारीख  शेअर केली आहे.

रणवीर सिंहचा धुरंधर हा चित्रपट डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला होता.  सुरुवातीला या चित्रपटाला प्रसिद्धी मिळाली नव्हती. नंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.  दरम्यान, आता प्रेक्षकवर्ग  धुरंधर चित्रपटाच्या सिक्वेलच्या प्रतिक्षेत आहेत.  धुरंधर 2 या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार? असा प्रश्न  उपस्थित होत आहे. या प्रश्नावर रणवीर सिंह यानं पोस्ट शेअर करुन उत्तर दिलं आहे.  त्यानं ट्रेलरबाबत अपडेट दिली आहे. 

अलिकडेच रणवीर सिंहने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.  ज्यामध्ये तो बंदूक धरलेला दिसत आहे.  पोस्टवर 'धुरंधर: द रिव्हेंज..  ट्रेलर 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजून 1 मिनिटाने रिलीज होणार', असं लिहिलं आहे. त्यानं या पोस्टवर, 'स्वत:ला तयार ठेवा', असं कॅप्शन देखील दिलं आहे. हा चित्रपट तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकवर्ग ट्रेलरची वाट पाहत होते. सुरुवातीला या चित्रपटाचा ट्रेलर 4 मार्च रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली होती.  परंतु, निर्मात्यांनी  अधिकृत घोषणा केली नव्हती.  चंद्रग्रहणामुळे ट्रेलर प्रदर्शित होण्यास उशीर  झाल्याचे उघड झाले.  दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर आता उद्या प्रदर्शित होईल, हे कन्फर्म झालं आहे.  सध्या प्रेक्षकवर्ग या चित्रपटाच्या प्रतिक्षेत असून,  19 मार्च 2026 रोजी प्रेक्षकांना धुरंधर 2 सिनेमागृहात पाहता येईल.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Embed widget