Bollywood Director Struggle Life Story: सर्वात मोठा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर भस्मासूर बनला 'हा' दिग्गज दिग्दर्शक; अहंकार जागा झाला अन् होतं नव्हतं ते सगळं धुळीस मिळालं
Bollywood Director Struggle Life Story: यश आणि प्रसिद्धीमुळे दिग्दर्शक एवढा अहंकारी झाला की, त्यानंतर केलेले एक, दोन नव्हे तर 26 सिनेमे फ्लॉप झाले. दिग्दर्शकानं त्याच्या आजवरच्या कारकीर्दीत 36 सिनेमे बनवले, त्यापैकी 26 सिनेमे बॉक्स ऑफिसवर (Box Office) सपशेल फ्लॉप ठरले.

Bollywood Director Struggle Life Story: बॉलिवूडचं (Bollywood News) जग म्हणजे, मायाजाल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इथे दररोज म्हटलं तरी अनेकजण आपलं नशीब आजमवायला येतात. पण, सर्वांनाच यश मिळत नाही. काहीजण यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतात खरे, पण फार कमी जणांना ते टिकवता येतं. अनेकजण नाव कमावतात, अगदी दिग्गजांच्या यादीत जाऊन बसतात, पण डोक्यात हवा जाते आणि सर्व गमावतात. असंच काहीसं झालंय बॉलिवूडच्या एका दिग्गज दिग्दर्शकासोबत (Bollywood Director). या दिग्दर्शकानं बॉलिवूडमध्ये येताच धुमाकूळ घातलेला. त्यानं बनवलेले काही सिनेमे आजही कल्ट सिनेमे म्हणून ओळखले जातात. पण, म्हणतात ना, प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली की, काही खरं नाही. असंच या दिग्दर्शकासोबत घडलं. मिळालेलं यश आणि प्रसिद्धीमुळे दिग्दर्शक एवढा अहंकारी झाला की, त्यानंतर केलेले एक, दोन नव्हे तर 26 सिनेमे फ्लॉप झाले. दिग्दर्शकानं त्याच्या आजवरच्या कारकीर्दीत 36 सिनेमे बनवले, त्यापैकी 26 सिनेमे बॉक्स ऑफिसवर (Box Office) सपशेल फ्लॉप ठरले.
आम्ही ज्या दिग्दर्शकाबाबत बोलत आहोत, ते नाव म्हणजे, फिल्ममेकर राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma). कधीकाळी आपली वेगळी विचारसरणी आणि बोल्ड सिनेमांसाठी ओळखले जाणारे राम गोपाल वर्मा, नंतर मात्र सिनेमांपेक्षा वादांसाठीच जास्त ओळखले जाऊ लागले. बरं त्यांनी स्वतःच आता कबुल केलंय की, त्यांच्या काही चुका आणि अंहकारामुळे त्यांच्या कारकिर्दीला नुकसान झालंय. अलिकडच्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांचा सुपरहिट सिनेमा 'सत्या'ची आठवण करून दिली आणि म्हटलं की, त्या सिनेमानंतर ते भरकटले. त्यांनी असंही कबुल केलंय की, त्यांचे अनेक वाईट सिनेमे त्यांची स्वतःची विचारसरणी आणि निर्णयांचे परिणाम होते.
'सत्या'नंतर अहंकाराच्या वादळात भरकटले
राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं की, 'सत्या' सिनेमातून त्यांना अंडरवर्ल्डचं खरं जग सर्वांना दाखवायचं होतं. सर्वसामान्य लोक बातम्यांमध्ये फक्त एन्काउंटर आणि खून याबाबत ऐकायचे. पण, त्याकाळात त्यांनी गँगस्टर्सचं वैयक्तिक आयुष्य, नाती आणि इमोशन्स दाखवले. नेमकं याच गोष्टींनी 'सत्या'ला वेगळं आणि अगदी खास बनवलं. पण, त्यानंतर मात्र ते तोच प्रामाणिकपणा आणि उत्सुकता राखण्यात अयशस्वी ठरले. राम गोपाल वर्मा यांनी कबुल केलं की, 'कौन' बनवणं चुकीचं नव्हतं, पण 'सत्या'नंतर त्यानं काहीतरी मोठं करायला हवं होतं. याचा दोष त्यांनी त्यांचा अहंकार आणि निष्काळजीपणाला दिला.
"माझे हिट सिनेमे अपघात होते..."
राम गोपाल वर्मा यांनी स्पष्ट केलं की, त्याच्या हिट फिल्म्स जसं की, 'कंपनी', 'रंगीला' आणि 'भूत' बनवताना कोणतंही प्लानिंग केलं नव्हतं. तर, योगायोग होता. त्यांच्या मते, जर त्यांना हिट सिनेमा बनवण्याचं सूत्र माहीत असतं, तर ते कधीही फ्लॉप झाले नसते. ते फक्त सिनेमे बनवतात, त्यांचं यश किंवा अपयश त्यांच्या हातात नसतं. जेव्हा त्यांनी 'सत्या' पुन्हा पाहिला तेव्हा त्यांना जाणवलं की, त्यांचा खरा हेतू फक्त काही चित्रपटांमध्येच दिसलाय.
त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट सिनेमाबद्दल बोलताना, त्यांनी 'आग' सिनेमाबाबत सांगितलं. त्यांनी सांगितलं की, हा त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतला सर्वात वाईट सिनेमा होता, ज्यामध्ये सर्वाधिक वेळ आणि पैसा खर्च झाला. त्यानंतर त्यांनी 'डिपार्टमेंट'चा उल्लेख केला. सोशल मीडियावरील त्यांच्या इमेजबाबत त्यांनी सांगितलं की, लोक केवळ त्यांच्या ट्वीटवरुन त्यांना जज करतात. त्यांनी स्वतःला 'बेजबाबदार आणि अत्यंत स्वार्थी' असं वर्णन केलं आणि सांगितलं की, ते लोकांच्या प्रेमासाठी नाही तर, त्यांच्या आवडीसाठी सिनेमे बनवतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















