![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
दीपिका पदुकोणच्या कुशीत चिमुकली परी, रणवीर सिंहची लेकीकडे प्रेमळ नजर; आई-बाबा दीपवीरचा पहिला फोटो व्हायरल
Deepika Padukone Holding Daughter First Photo : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा तिच्या मुलीसोबतचा पहिला फोटो समोर आला आहे.
![दीपिका पदुकोणच्या कुशीत चिमुकली परी, रणवीर सिंहची लेकीकडे प्रेमळ नजर; आई-बाबा दीपवीरचा पहिला फोटो व्हायरल First Photo of Deepika Padukone Holding Her Daughter in Lap Goes Viral Ranveer Singh Deepika Padukone Baby photo marathi news दीपिका पदुकोणच्या कुशीत चिमुकली परी, रणवीर सिंहची लेकीकडे प्रेमळ नजर; आई-बाबा दीपवीरचा पहिला फोटो व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/16/93c0639af6a8e5c8c26be5bb1619dbfe1726463236330322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Deepika Padukone Daughter First Photo : अभिनेत्री दीपिका पदुकोणनं काही दिवसांपूर्वीच गोंडस चिमुकलीला जन्म दिला आहे. दीपिका पदुकोणला डिलिव्हरीनंतर रविवारी डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर अभिनेता रणवीर सिंह दीपिका पदुकोण आणि चिमुकल्या परीला घेऊन मुंबईतील घरी परतला आहे. रुग्णालयातून घरी परतल्यावर अभिनेत्री दीपिका पदुकोणचा तिच्या मुलीसोबतचा पहिला फोटो समोर आला आहे.
आई दीपिकाच्या कुशीत चिमुकली परी
अभिनेत्री दीपिका पदुकोण रविवारी चिमुकल्या लक्ष्मीसह घरी परतली आहे. चिमुकलीला घेऊन घरी परतताना दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यानंतर या फोटो आणि व्हिडीओकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. ज्यामध्ये कारमध्ये दीपिका पदुकोणने चिमुकल्या परीला हातात धरल्याचं स्पष्ट दिसत आहे. तिच्या बाजूला रणवीर सिंह बसल्याचंही दिसत आहे.
आई-बाबा दीपवीरचा पहिला फोटो व्हायरल
दीपिका पदुकोण रुग्णालयातून बाहेर पडताना मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळीचे काही फोटो समोर आले आहेत. व्हायरल फोटोंमध्ये दीपिका पदुकोणनं मुलीला कुशीत घेतल्याचं दिसत आहेत, तर शेजारी बसलेला रणवीर चिमुकल्या परीकडे पाहताना दिसत आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. फॅन्स चिमुकलीची एक झलक पाहण्यासाठी खूप आतूर झाले आहेत.
View this post on Instagram
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये चार कार हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहेत. यावेळी दोघांचेही कुटुंब एकत्र असल्याचं माहिती समोर आली आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे चाहत्यांना चिमुकलीच्या जन्माची गूड न्यूज दिली होती. यानंतर चिमुकल्या लक्ष्मीसह आई-बाबा दीपवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Shraddha Arya : 'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीनं दिली 'गूड न्यूज', श्रद्धा आर्या लवकरच देणार गोंडस बाळाला जन्म
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)