Deepveer Daughter Dua Viral Photo : मम्मा दीपिका, पप्पा रणवीरनं शेअर केलाय चिमुकल्या 'दुआ'चा फोटो? सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Deepveer Daughter Dua Viral Photo : सध्या सोशल मीडियावर दीपिका आणि रणवीरचा चिमुकलीसोबतचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला जात आहे.
Deepika Padukone Ranveer Singh Daughter Dua Viral Photo: काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांनी आपल्या आयुष्यातील गोड क्षणांची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. तेव्हापासूनच दीपिका आणि तिच्या होणाऱ्या बाळाबाबात चाहत्यांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. अखेर दीपिकानं गूड न्यूज दिली आणि तिच्या पोटी एका चिमुकलिनं जन्म घेतल्याचं जाहीर केलं. दीपवीरनं तिच्या गोंडस चिमुकलीचं नाव 'दुआ' ठेवलं आहे. चाहत्यांनी दीपवीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला. तेव्हापासूनच दीपिकानं सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर केल्या, पण चाहत्यांना आतुरता आहे ती, छोट्या दुआची एक झलक पाहण्याची. पण, सध्या चाहत्यांची ही प्रतिक्षा संपल्याचं बोललं जात आहे.
सध्या सोशल मीडियावर दीपिका आणि रणवीरचा चिमुकलीसोबतचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला जात आहे. पण, खरा प्रश्न हा आहे की, हा फोटो खरंच रणवीर-दीपिकाच्या दुआचा आहे? कारण हा व्हायरल फोटो दीपिका किंवा रणवीर कुणाच्याच ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो नेटकऱ्यांना दिसला नाही. त्यामुळे नेटकरी आता कोड्यात पडले आहेत.
THANK YOU FOR GROK ELON! 😭#DeepVeer #DuaPadukoneSingh 🧿🤍✨ pic.twitter.com/OcJHt47VAU
— Rimmi🌦 (@BedaTarrJaye) December 11, 2024
दीपिका आणि रणवीरचे सोशल मीडिया अकाउंट पाहिले तर दोघांनीही आजवर आपल्या लेकीचा एकही फोटो शेअर केलेला नाही. पण, मग सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो कुणी काढले? कुठून आले? हे फोटो खरे आहेत का? अशा अनेक चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये दुआ रणवीर आणि दीपिकासोबत असल्याचा दावा केला जात आहे. पण हे फोटो खरे नाहीत. दीपवीरनं त्यांच्या सोशल मीडियावर कोणताही फोटो शेअर केलेला नाही. तसेच, हे AI जनरेट केलेले फोटो असल्याचं आढळून आलं आहे. याची माहिती 'सजग'च्या टीमला मिळाली आणि या फोटोंची Decopy.ai द्वारे तपासणी करण्यात आली, त्यानंतर हे फोटो फेक असल्याचं निष्पन्न झालं आहे.
काही दिवसांपूर्वीच दीपिका दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टसाठी बंगळुरूमध्ये दिसली होती. डिलीव्हरीनंतर हा तिचा पहिला पब्लिक अपीयरन्स होता. ती दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये अगदी मोकळेपणानं एन्जॉय करताना दिसून आली. तिनं व्हाईट लूज टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स वेअर केली होती. तिनं स्वतःचे केस मोकळे सोडले होते.
दरम्यान, दीपिकाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, दीपिका सिंघम अगेनमध्ये शक्ति शेट्टीच्या भूमिकेत दिसून आली होती. चित्रपट हिट झाला आणि बॉक्स ऑफिसवर शानदार कमाईही केली. फिल्ममध्ये अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, टाइगर श्रॉफ, करीना कपूर खान आणि इतरही अनेक स्टार्स होते.