बॉलिवूड अभिनेत्रीचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत मतदान, भारतीय नसल्याचं सत्य समोर येताच चाहत्यांना बसला धक्का
Who Is Akansha Ranjan Kapoor : एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत मतदान केलं आहे, यामुळे तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नसल्याचं सत्य समोर आलं असून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Bollywood Actress Voted in Us Presidential Election : बॉलिवूडमध्ये फक्त देशातीलच नाही तर विदेशातील अनेक कलाकारांनीही नाव कमावलं आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा जन्म जरी दुसऱ्या देशात झाला असला, तरी त्यांनी नाव आणि प्रसिद्धी भारतात कमावली आहे. काही बॉलिवूड सेलिब्रिटींची जन्मभूमी भारत नसला तरी कर्मभूमी भारत आहे. अशा सेलिब्रिटींकडे भारतीय नागरिकत्व नाही, त्यामुळे निवडणुकीच्या वेळी त्यांना भारतात मतदान करता येत नाही. अशा वेळी ते स्टार्स ट्रोलही होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जिने नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत मतदान केलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्रीचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत मतदान
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मतदान केलं आहे. ही बॉलिवूड अभिनेत्री भारतीय नागरिक नसून अमेरिकन नागरिक असल्याचं कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. याच कारणामुळे ही अभिनेत्री सध्या चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री अमेरिकन सिटीझन असल्याचं समोर येताच इंटरनेटवर खळबळ माजली आहे. कारण, तिच्या बहुतेक फॅन्सना ही अभिनेत्री अमेरिकम नागरिक असल्याची माहिती नव्हती.
अभिनेत्री भारतीय नसल्याचं समजताच चाहत्यांना मोठा धक्का
या अभिनेत्रीचं नाव आकांक्षा रंजन कपूर आहे. नुकतेच या 31 वर्षीय अभिनेत्रीने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केले. मंगळवारी, ती लाखो अमेरिकन लोकांमध्ये होती ज्यांनी देशाचे 47 वे अध्यक्ष निवडण्यासाठी मतदान केले. 2024 च्या या निवडणुकीत रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात चुरशीची लढत असल्याचे मानले जात आहे, त्यामुळे निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, आकांक्षाच्या नागरिकत्वाने भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
कोण आहे ही अभिनेत्री?
मुंबईत राहणारी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूरने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिने मतदान केल्याचे इंस्टाग्रामवर सांगून तिच्या फॉलोअर्सना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती 'मी मतदान केले' असा बॅज घातलेली दिसत आहे. या स्टोरीमध्ये तिने कमला हॅरिसचा स्टिकर देखील पोस्ट केला आहे, ज्यावरून तिने डेमोक्रॅट पक्षाला मतदान केल्याचं स्पष्ट होत आहे. पण, ती भारतीय नसून अमेरिकन नागरिक असल्याची त्याच्या बहुतांश चाहत्यांना कल्पना नव्हती आणि या बातमीने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.
अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूर ही अभिनेता-दिग्दर्शक शशी रंजन आणि त्यांची पत्नी अनु रंजन यांची मुलगी आहे. तिचा जन्म मुंबईत झाला आणि शिक्षण जमनाबाई नरसी शाळेत झालं. आकांक्षाने 2020 मध्ये नेटफ्लिक्सवरील 'गिल्टी' चित्रपटामधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तिने नेटफ्लिक्सच्या 'मोनिका... ओ माय डार्लिंग' या चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :