Bollywood Actress : 7 सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेत्रीचा सिनेसृष्टीला रामराम; सुपरस्टारच्या भावाच्या प्रेमात वेडी झाली, मृत्यूचं गुढ आजही कायम
Bollywood Actress Death Mystery : बॉलिवूड अभिनेत्रीने सात सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर सिनेसृष्टीला रामराम केला. अल्पावधीतच अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे.
Bollywood Actress Death Mystery : मनोरंजनसृष्टीतील अनेक अभिनेते (Actors) आणि अभिनेत्री (Actress) खूप कमी कालावधीसाठी इंडस्ट्रीचा भाग राहिलेले आहेत. हे कलाकार यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. बॉलिवूडच्या (Bollywood) एका अभिनेत्रीने सात सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फक्त सात चित्रपटांमध्ये काम करुनही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्रीच्या निधनाला 24 वर्षे झाली असली तरी आजही चाहत्यांच्या मनात ती जिवंत आहे. 'हीर-रांझा' आणि 'हंसते जख्म'साठी ती ओळखली जाते. अभिनेत्रीने खूप कमी काम केलं असलं तरी आजही चाहते तिला ओळखतात.
सात सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव प्रिया राजवंश (Priya Rajvansh) आहे. प्रियाचा वयाच्या 22 व्या वर्षी लंडनमध्ये एक फोटो क्लिक करण्यात आला होता. लंडनमध्ये काढलेला तिचा फोटो बॉलिवूडपर्यंत पोहोचला. प्रियाचा हा फोटो सिनेनिर्माता ठाकुर रणवीर सिंह यांच्या पसंतीस उतरला. त्यामुळे 'हकीकत' चित्रपटासाठी प्रियाची निवड झाली. तिचा हा चित्रपट सुपरहिट ठरला.
चेतन आनंदच्या पडलेली प्रेमात
'हकीकत' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रिया राजवंश चेतन आनंदच्या प्रेमात पडली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते रिलेशनमध्ये आले होते. त्यानंतर प्रिया फक्त चेतन आनंदच्या चित्रपटांमध्ये काम करत असे. सिनेनिर्मितीमध्ये तिला आवड निर्माण होत होती. प्रिया 20 वर्षे इंडस्ट्रीचा भाग होती. प्रियाने हीर रांझा, हंसते जख्म, कुदरत, साहेब बहादुर आणि हाथों की लखींरे सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात आले चढ-उतार
प्रिया राजवंश अभिनयक्षेत्रात यशस्वी झाली असली तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र तिला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. प्रिया चेतनसोबत राहायला लागली होती. अभिनेत्रीचं 2000 मध्ये निधन झालं. प्रियाचा 2000 मध्ये मर्डर झाल्याचं म्हटलं जातं. तिचा मर्डर चेतन आनंदच्या जुहू स्थित बंगल्यात झाला होता. प्रियाच्या मर्डरसाठी चेतन आनंदचे मुलं केतन आनंद आणि विवेक आनंद आणि कर्मचारी माला चौधरी आणि अशोक चिन्नास्वामी आरोपी ठरले होते. रिपोर्ट्सनुसार, चेतन आनंदच्या प्रॉपर्टीवर प्रियाचा हक्क असल्याने तिचा मर्डर करण्यात आला. प्रियाच्या मृत्यूनंतर चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण 2002 मध्ये त्यांना जामिन मिळाला. प्रियाच्या मृत्यूचं नक्की कारण अद्याप समोर आलेलं नाही. तिच्या मृत्यूचं गुढ आजही कायम आहे.
संबंधित बातम्या