Bollywood Actors : कोणाचे 25, तर कोणाचे 50 रुपये; अमिताभ बच्चन, शाहरुख खान ते पंकज त्रिपाठी; तुमच्या लाडक्या बॉलिवूडकरांची पहिली कमाई किती होती?
Bollywood Stars First Salary : अमिताभ बच्चन, शाहरुख खानसह अनेक कलाकार बॉलिवूड सुपरस्टार्सच्या यादीत सामील झाले आहेत. प्रचंड मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडकर आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.
Bollywood Stars First Salary : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींची बातच न्यारी असं अनेकदा म्हटलं जातं. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. बॉलिवूडकरांकडे आज प्रचंड पैसा असला तरी करिअरच्या सुरुवातीला त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. आज हे अभिनेते एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये आकारतात. बॉलिवूड सेलिब्रिटी एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. त्याप्रमाणे त्यांची पहिली कमाई किती होती? (Bollywood Stars First Salary) हे जाणून घेण्याचीदेखील चाहत्यांना कमालीची उत्सुकता असते. जाणून घ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) ते पंकज त्रिपाठी या कलाकारांच्या पहिल्या कमाईबद्दल...
शाहरुख खान (Shah Rukh Khan) : शाहरुख खान आज बॉलिवूडचा बादशाह आहे. शाहरुख आजच्या घडीला एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये आकारत असला तरी करिअरच्या सुरुवातीला त्याने खूप कमी पैशांमध्ये काम केलं आहे. शाहरुख खानची पहिली कमाई फक्त 50 रुपये होती. पंकज उधास यांच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये शाहरुखला हे पैसे मिळाले होते.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहेत. बिग बी अभिनेता होण्याआधी कोलकात्यातील एका कंपनीत नोकरी करायचे. त्यांची पहिली कमाई 1640 रुपये होती.
सलमान खान (Salman Khan) : भाईजान सलमान खान बॉलिवूडचा लोकप्रिय सुपरस्टार आहे. सलमान खान एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये आकारतो. पण अभिनेता होण्याआधी भाईजान बॅकग्राऊंड डान्सर होता. मीडिया रिपोर्टनुसार, भाईजानला ताज हॉटेलमध्ये नृत्य सादरीकरणाचे 75 रुपये मिळाले होते.
अक्षय कुमार (Akshay Kumar) : अक्षय कुमारदेखील श्रीमंत अभिनेता आहे. वर्षाला अनेक चित्रपटांमध्ये तो झळकतो. अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी बॉलिवूडचा खिलाडी बँऑफमध्ये शेफ म्हणून नोकरी करायचा. याचे त्याला 1500 रुपये मिळत असे.
इरफान खान (Irrfan Khan) : इरफान खान आज हयात नसला तरी चाहत्यांच्या हृदयात तो जिवंत आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. इरफान खान ट्यूशन क्लासेस घेत असे. याचे त्याला 25 रुपये मिळायचे.
पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) : बॉलिवूडनंतर ओटीटीवर धुमाकूळ घालणाऱ्या पंकज त्रिपाठीचा प्रवासदेखील संघर्षमय होता. पंकज त्रिपाठी आज बॉलिवूडचा स्टार असला तरी त्याला सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगायला आवडतं. अभिनेत्याची पहिली कमाई 1700 रुपये होती.
आमिर खान (Aamir Khan) : आमिर खान खूप निवडक चित्रपटांमध्ये काम करतो. पण त्याचे चित्रपट ब्लॉकबस्टर होतात. आमिर खानची पहिली कमाई 1000 रुपये होती. 'कयामत से कयामत' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याला हे मानधन मिळालं होतं.
संबंधित बातम्या