एक्स्प्लोर
'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' चा फर्स्ट लूक रिलीज; विंग कमांडरच्या भूमिकेत दिसणार अजय देवगन
अजय देवगनचा आगामी चित्रपट 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' चा फर्स्ट लूक रिलीज झाला असून अजय या चित्रपटात विंग कमांडरच्या भूमिकेत दिसणार आहे.
मुंबई : चित्रपट दिग्दर्शक अभिषेक दुधियाने आपला आगामी चित्रपट 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. अजय देवगन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगन 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात वायुसेना अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.
'भुज : द प्राइड ऑफ इंडिया'चा फर्स्ट लूकबाबत बोलायचे झाले तर यामध्ये अजय देवगनने भारतीय वायुसेना अधिकाऱ्याच्या वर्दीत दिसून येत आहे. अजयच्या मागे भारतीय वायुसेनेचं एक विमान दिसत आहे. ज्यावर भारतीय तिरंगा दिमाखात फडकताना दिसत आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज होताच, फॅन्समध्ये चर्चा रंगल्या आहेत. चित्रपटाचा पहिला लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चित्रपटाची कथा 1971 मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धावर आधारित आहे. चित्रपट यावर्षी 14 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगन स्कॉड्रन लीडर विजय कर्णिक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, स्कॉड्रन लीडर विजय कर्णिक यांनी 1971च्या लढाई दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी पाकिस्तानच्या सर्व एअरस्पेसचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं होतं.' अजय देवगन आणि काजोल दोघेही तब्बल 11 वर्षांनी आगामी चित्रपट 'तानाजी : द अनसंग वारियर'मध्ये दिसणार आहेत. 'तानाजी : द अनसंग वारियर' या चित्रपटात स्वतः अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर याव्यतिरिक्त सैफ अली खान राजपूत मुघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. एवढच नाहीतर मराठी अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री पद्मावती राव रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. तसेच या चित्रपटात काजोलही झळकणार असून ती तानाजी मालुसरे यांच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. संबंधित बातम्या : 'पहिला वार लाखमोलाचा'; 'तानाजी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित अखेर 'गुल मकई'च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; नोबेल विजेती मलालाचा जीवनपट उलगडणारा चित्रपट 62 पुरस्कार पटकावणाऱ्या 'स्कॉटलॅन्ड' चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन 'बंटी और बबली 2'ची शुटिंग सुरू, 11 वर्षांनी एकत्र दिसणार सैफ अली खान आणि राणी मुखर्जीIt’s a privilege to present @ajaydevgn sir’s first look as Sq. Ld. Vijay Karnik from my upcoming directorial film #BhujThePrideOfIndia . #14Aug2020. pic.twitter.com/5pZiORdXjs
— Abhishekdudhaiya (@AbhishekDudhai6) January 1, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement