Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी
aIran vs America : अमेरिकेनं हिंद महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ इराणच्या जहाजावर पाणबुडीद्वारे हल्ला केला. यात 80 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष पाचव्या दिवशी देखील कायम आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. याच दरम्यान हिंदी महासागरात अमेरिकेनं पाणबुडीचा वापर करत इराणच्या युद्धनौकेवर हल्ला केला, यात 80 जणांचा मृत्यू झाला आहे. युद्धनौकेतून प्रवास करणारे अनेक जण जखमी झाले आहेत. इराणी युद्धनौकेकडून संकटाचा अलर्ट देण्यात आल्यानंतर श्रीलंकेच्या सैन्यानं बचाव कार्य आणि शोध कार्य सुरु केलं.
श्रीलंकेच्या नौदलाकडून आणि संरक्षण मंत्रालयाकडून या हल्ल्याला दुजोरा देण्यात आला आहे. इराणच्या जहाजावर एकूण 180 लोक होते, त्यापैकी 80 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 32 जणांना वाचवण्यात यश आलं असून काही जण बेपत्ता आहेत.
श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार इराणच्या जहाजाकडून आपत्कालीन सिग्नल मिळाल्यानंतर श्रीलंकेच्या नौसेनेकडन बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
श्रीलंकेच्या नौदलाकडून इराणच्या जहाजावरील 32 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार आहेत. श्रीलंकेच्या विदेश मंत्री विजिता हेराथ यांनी म्हटलं की बुडणाऱ्या जहाजातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी किनाऱ्यावर आणलं गेलं आहे.
अमेरिकेनं घेतली हल्ल्याची जबाबदारी
अमेरिकेचे संरक्षण विभागाचे सचिव पेटे हेगसेठ यांनी हिंदी महासागरामध्ये टॉरपॅडोचा वापर करुन इराणच्या युद्धनौकेवर हल्ला केल्याचं म्हटलं. त्यांनी इराणच्या युद्धनौकेचं नाव सांगितलं नाही.या हल्ल्यासाठी अमेरिकेनं टॉरपॅडोचा वापर केल्याचं बोललं जात आहे. हेगसेठ यांनी इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न केला गेल्याचा दावा केला. अमेरिकेनं इराणच्या युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ देखील जारी केला आहे.
दरम्यान, इराणची IRIS Dena आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्यू 2026 मध्ये सहभागी झाली होती. हा कार्यक्रम विशाखापट्टणम येथे पार पडला होता. यानंतर इराणची युद्धनौका परत निघाली होती.
https://t.co/PiqQpVIrMu pic.twitter.com/Wc1e0B0um7
— Department of War 🇺🇸 (@DeptofWar) March 4, 2026






















