एक्स्प्लोर

तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?

Tamil Nadu Election : तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी द्रमुक आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाची चर्चा पार पडली आहे. 

चेन्नई : आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी द्रमुक आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाची चर्चा अंतिम झाली आहे. द्रमुकनं काँग्रेसला 28 जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.द्रमुक तामिळनाडूमधील राज्यसभेची काँग्रेसला एक जागा देण्यास तयार झाली आहे. काँग्रेस आणि द्रमुक यांच्यातील जागा वाटप द्रमुकचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के सेल्वापेरुनथगई यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे प्रभारी गिरीश चोंदणकर आणि द्रमुकचे नेते उपस्थित होते. द्रमुक मुख्यालयात हा निर्णय घेण्यात आला. 

द्रमुक आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाचा तिढा गेल्या आठवड्यात सुटला नव्हता. काँग्रेसनं द्रमुककडे किमान 34 जागा मिळाव्या अशी मागणी केली होती. मात्र, द्रमुकनं काँग्रेसला 25 जागा आणि राज्यसभेची एक जागा देऊ असं म्हटलं होतं. काँग्रेस आणि द्रमुक यांच्यातील आघाडी तुटणार की काय अशी स्थिती देखील निर्माण झाली होती. मात्र, द्रमुकच्या वरिष्ठ नेत्या खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या मध्यस्थीनंतर तिढा सुटला. कनिमोळी यांनी काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम आणि पी. चिदंबरम यांच्यासोबत चर्चा केली. 

पी. चिदंबरम आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सेल्वापेरुनगथई यांनी एम. के. स्टॅलिन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कनिमोळी उपस्थित होत्या. या चर्चेद्वारे द्रमुककडून काँग्रेसला जागा वाढवून देण्यास सहमती दर्शवण्यात आली. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडला कळवण्यात आलं. 

कनिमोळी यांच्या मध्यस्थीनं काँग्रेस आणि द्रमुक यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. दरम्यान पुदूचेरी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत द्रमुक सोबत चर्चा सुरु करण्यात येईल  असं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं. 

2021 च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकनं विजय मिळवला होता. 234 जागांपैकी  133 जागांवर द्रमुक विजयी झालं होतं. तर, अण्णाद्रमुक पक्षाला 66 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसनं गेल्या निवडणुकीत 18 जागांवर विजय मिळवला होता. पीएमके पक्षानं 5, व्हीसीके पक्षानं 4 आणि इतरांनी 8 जागांवर विजय मिळवला होता. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tamilnadu Custodial Deaths: बाप लेकाचा पोलिस कोठडीत मृत्यू, धमक्यांना न घाबरता हेड कॉन्स्टेबल रेवंती यांची साक्ष ठरली टर्निंग पाँईट अन् तब्बल 9 पोलिसांनाच फाशीची शिक्षा! देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना
बाप लेकाचा पोलिस कोठडीत मृत्यू, धमक्यांना न घाबरता हेड कॉन्स्टेबल रेवंती यांची साक्ष ठरली टर्निंग पाँईट अन् तब्बल 9 पोलिसांनाच फाशीची शिक्षा! देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना
Public Interest Litigations: आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Women Reservation Bill: केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
Assembly Election 2026: आसामसह केरळ आणि पुदुचेरीमध्ये मतदानाची रणधुमाळी, 296 जागांसाठी 1,995 उमेदवारांच आज भवितव्य ठरणार; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आसामसह केरळ आणि पुदुचेरीमध्ये मतदानाची रणधुमाळी, 296 जागांसाठी 1,995 उमेदवारांच आज भवितव्य ठरणार; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
Baramati Byelection: बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
Byelection: राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
राहुरीत शेवटच्यादिवशी अनेक उमेदवारांची माघार, 7 उमेदवार रिंगणात; शिवसेनेतील बंडखोरी कायम
Satara ZP Election : राष्ट्रवादी ऐवजी भाजपच्या उमेदवाराला मतदान, पक्षाचा व्हिप मोडला, राष्ट्रवादी काँग्रेसकडून लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळेंविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु
लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळे अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपात्रतेची कारवाई सुरु
Harshwardhan Sapkal On Baramati By Election 2026: बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; सपकाळांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
Embed widget