एक्स्प्लोर

Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात आहे की घातपात आहे, यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात असून त्याबाबच जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार पवार रोहित हे सातत्याने याविषयावर पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित करत आहे, त्याचबरोबर गोळा केलेली माहिती देखील देत आहेत. यापूर्वी त्यांनी तीन पत्रकार परिषद घेतल्या. तर आज चौथ्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी (Rohit Pawar) मोठा गौप्यस्फोट केला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बोलून दाखवलेल्या या गोष्टीमुळे आता पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. रोहित पवारांनी (Rohit Pawar)  म्हटलं की अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्याठिकाणी काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती. अपघातापूर्वी रेकी झाली होती. या गोष्टीचा सखोल गुन्हेगारी पध्दतीने तपास झाला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.

बारामती विमानतळाची रेकी झालेली?
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी म्हटलं की या गोष्टींचा देखील क्रिमीनल ॲंगलने तपास केला गेला पाहिजे, “काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती. अपघातापूर्वी रेकी झाली होती. याची आम्हाला पक्की माहिती नाही. पण त्या अँगलने चौकशी झाली पाहिजे. याचा सखोल तपास केला गेला पाहिजे अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे.

 रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
दावोस दौऱ्यातील विमानाचा प्रवास आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विमान पाडण्याचा इशारा इराण आणि इराकने दिला होता, असा अत्यंत गंभीर खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. डीजीसीए अहवालानंतर रोहित पवारांनी अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. 

रोहित पवार यांच्या माहितीनुसार, 16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान एकनाथ शिंदे साहेब दावोसला गेले होते. आंतरराष्ट्रीय प्रवासात 'फ्लाईट प्लॅन' द्यावा लागतो आणि इतर देशांची परवानगी घ्यावी लागते. "बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलही जाऊ शकतं आणि तसच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं", असा दावा त्यांनी केला आहे.
इराकने सुद्धा हेच केलं
विमानात इंधन (Refueling) भरल्यानंतर ते झुरिकला जात असताना इराणच्या हद्दीतून गेले. इराणने सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू. त्यावेळी या विमानात स्वतः एकनाथ शिंदे आणि इतर काही अधिकारी बसले होते. इराणने हटकल्यानंतर विमान इराकच्या बाजूला गेले, पण इराकने सुद्धा हेच केलं असे ते म्हणाले. शेवटी कोणतीही परवानगी नसल्याने परत ते विमानला आणल गेलं आणि सगळ्या परमिशन तिथे घेतल्या आणि मग झुरिकला तिथे गेलं असे रोहित पवार म्हणाले. 

VSR कंपनीचा हलगर्जीपणा आणि पैशांचा हव्यास
या घटनेचा संदर्भ देत पवार म्हणाले, व्हीएसआर (VSR) या कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवू नका कधी काय होईल कधी काय केलं जाईल हे कोणाला सांगता येत नाही. त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला की, कोविडच्या काळात प्रायव्हेट जेटचे तिकीट विकून पेशंट्सकडून भरमसाट पैसे उकळल्यामुळे युएई (UAE) मध्ये त्यांना सहा महिन्यांसाठी बॅन केलं होतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीतही या कंपनीने असा हलगर्जीपणा नाहीतर मुद्दामून गोष्टी केल्या अस आमचं मत असल्याचे ते म्हणाले. 

पुरावे नष्ट करण्याचा आणि कागदपत्रे रंगवण्याचा आरोप
रोहित पवार यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, कागदपत्र रंगवली जाऊ शकतात जी रंगवली जात आहेत. तसेच, अपघात आणि पत्रकार परिषदेनंतर ही विमाने महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर काढली जात आहेत. हैदराबादला असलेले 'लेगसी 600' हे विमान आता सॅन मारिनो (युएसए) ला ट्रान्सफर करण्यात आले आहे. धंदा सुद्धा शिफ्ट करण्याचं काम तिथं सुरू झालं आहे. जर तुम्ही चोर नसालच घाबरता कशाला पण चोरच घाबरू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती असल्याचा आरोप त्यांनी केला. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 April 2026: आज 10 एप्रिलचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! देवी लक्ष्मीच्या पावलानं भरभराटीची हीच वेळ, आजचे राशीभविष्य
आज 10 एप्रिलचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! देवी लक्ष्मीच्या पावलानं भरभराटीची हीच वेळ, आजचे राशीभविष्य
LPG Crisis : होर्मुझमधून दररोज केवळ 15 जहाजांना जाण्याची परवानगी,  इराणने घातल्या कडक अटी, पुरवठा साखळीवर परिणाम
LPG Crisis : होर्मुझमधून दररोज केवळ 15 जहाजांना जाण्याची परवानगी,  इराणने घातल्या कडक अटी, पुरवठा साखळीवर परिणाम
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
टांगा शर्यतीचा मोह वृद्धाच्या जीवावर बेतला, टांग्याची धडक बसून मृत्यू, 7 आयोजकांवर निफाड पोलीसात गुन्हा दाखल
टांगा शर्यतीचा मोह वृद्धाच्या जीवावर बेतला, टांग्याची धडक बसून मृत्यू, 7 आयोजकांवर निफाड पोलीसात गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून किती जहाजांचं मार्गक्रमण? धक्कादायक आकडेवारी समोर
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाईल काढला अन् गिफ्ट दिला
Embed widget