एक्स्प्लोर

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप

इस्रायल-अमेरिकेनं इराणमध्ये युद्धआघाडी उघडली... इराणनं आखाती देशांमधले अमेरिकेचे तळ टार्गेट केले... पण गेली अनेक वर्षे अमेरिकेच्या हातात हात घालणाऱ्या युरोपनं युद्धातून अंग काढून घेतल्याचं दिसतंय. त्यामुळे ट्रम्प अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर भलतेच भडकलेत...
मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा भलताच चढला...   इराण शरण येत नाहीये... आखातातील आपले तळ टार्गेट करतोय...   ही ट्रम्प यांच्या संतापामागची कारणं असावीत, असं तुम्हाला वाटेल...   पण त्यांनी चिडचिड करण्याचं कारण त्यांचेच युरोपातले मित्र आहेत...   ट्रम्प यांनी युद्धात उडी घेतली खरी, मात्र युरोप काही त्यांच्या बाजुनं उभा राहण्यास तयार नाही...   त्यातही काही देशांचे नेते तर ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर टीकाच करतायत...   यात आघाडीवर आहेत ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ... 
आकाशातून एखादी राजवट बदलली जाते, असं मी मानत नाही" असं म्हणत स्टार्मर यांनी युद्धाला विरोध केला...   इराणच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक आहेत, तेवढेच आपले तळ वापरू दिले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं... 
स्टार्मर यांच्या या भूमिकेमुळे ट्रम्प यांना भलताच राग आलाय...   आता विंस्टन चर्चिल यांचा कालखंड नसल्याची खंतही नाराज ट्रम्पनी बोलून दाखवली...    स्पेनचे पंतप्रधान तर स्टार्मर यांच्या वरचढ निघाले...   आपले तळ अमेरिकेला वापरू देणार नाही, असं सांचेझ यांनी निक्षून सांगितलं...   मग ट्रम्प यांनी आपलं आवडतं हत्यार उपसलं... 'टॅरिफ'...   स्पेननं सहकार्य केलं नाही, तर पुन्हा एकदा भरमसाठ शुल्क लादण्याची धमकी त्यांनी देऊन टाकली... 
ट्रम्प यांच्या या धमकीला भीक न घालता सांचेझ आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत...   अमेरिका-इस्रायलचा हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग असल्याचं सांचेझ यांनी पुन्हा सांगितलंच...   ट्रम्प यांच्या धमकीनंतर युरोपातले इतर देशही स्पेनच्या पाठीशी उभे राहिले...   फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ आणि युरोपीयन काऊंसिलचे अध्यक्ष अँटेनिओ कोस्टा यांनी सांचेझ यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं...   युरोपातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीचे चांसेलर फ्रेडरिच मर्झ यांनी मात्र...    आपल्या युरोपीय साथीदारांपेक्षा थोडा वेगळा सूर लावलाय...   मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी इराणवरील हल्ल्याचं समर्थन केलं...   आपल्या युरोपीयन सहकाऱ्यांशी बोलून त्यांचं मन वळवण्याचाही प्रयत्न केला जाईल, असं आश्वासनही मर्झ यांनी दिलंय...   रशियानं युद्ध लादल्यानंतर अमेरिका आणि संपूर्ण युरोप युक्रेनच्या पाठीशी उभा राहिला...   पण अमेरिकेत सत्तांतर झालं... युद्धातून आणि 'नेटो'तून अंग काढून घेण्याची भाषा ट्रम्प यांनी सुरू केली...   आपल्या अंगणात सुरू असलेल्या युद्धातून सर्वात मोठा सहकारी बाहेर पडला, तर काही खरं नाही ही भीती युरोपला सतावतेय...   त्यामुळे ब्रिटनसह अनेक युरोपीयन राष्ट्रांचा आपला संरक्षणाचं बजेट वाढवत 'आत्मनिर्भर' होण्याकडे कल आहे...   शिवाय ट्रम्प यांनी छेडलेल्या व्यापार युद्धामुळे युरोपमध्ये महागाईचा भडका उडण्याची भीती आहे...   त्यामुळे किती काळ अमेरिकेच्या टाचेखाली राहायचं, असा विचार करत युरोपातल्या बहुतांश राष्ट्रांनी पर्याय शोधायला सुरुवात केल्याचं चित्र आहे...

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
Embed widget