Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
Iran Israel War Update: इराण-इस्त्रायल संघर्षात मृतांचा आकडा 1000 पार गेल्याने पश्चिम आशियात तणाव तीव्र झाला आहे. त्याचवेळी अमेरिकेने त्यांच्या पाकिस्तानातील नागरिकांनाही देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

कराची : पाकिस्तानातील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. कराची आणि लाहोर येथील अमेरिकन दूतावासांमध्ये कार्यरत असलेल्या गैर-आवश्यक कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ पाकिस्तान सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचवेळी इराणने सौदी अरबवर हल्ला करू नये अशी विनंती पाकिस्तानने केली होती. ती विनंती नाकारून इराणने सौदीवर हल्ले सुरूच ठेवले आहेत.
कराचीतील अमेरिकन कॉन्सुलेटबाहेर झालेल्या हिंसक आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला. रविवारी झालेल्या आंदोलनात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 60 हून अधिक जण जखमी झाले. काही आंदोलकांनी कॉन्सुलेटमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. देशभरात आंदोलनकर्ते आणि सुरक्षाबळांमध्ये झालेल्या झटापटीत एकूण 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
US Pakistan Security Alert : कराचीतील हिंसाचारानंतर तातडीचा निर्णय
कराची आणि लाहोरमधील अमेरिकन अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. वाढत्या अस्थिरतेमुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Iran Israel War Update : मृतांचा आकडा 1000 पार, संघर्ष अधिक तीव्र
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र परिस्थिती शांत होण्याऐवजी अधिक चिघळत असल्याचे दिसत आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, पाच दिवसांत इराणवर झालेल्या हल्ल्यांत मृतांची संख्या 1000 पेक्षा अधिक झाली आहे.
Middle East Tension : सौदी अरेबियावर ड्रोन हल्ला, ऊर्जा बाजारात खळबळ
इराणकडून पश्चिम आशियातील देशांवर हल्ले सुरूच असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत इराणने सौदी अरेबियावरही हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. रियाध येथील अमेरिकन दूतावासावर इराणी ड्रोनने हल्ला केल्याचे वृत्त आहे.
पूर्वेकडील धहरान शहरात, जिथे तेल कंपनी Saudi Aramco चे मुख्यालय आहे, तेथेही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. रास तनुरा येथील प्रमुख तेल शुद्धीकरण प्रकल्पावरही ड्रोन हल्ला झाल्याने जागतिक ऊर्जा बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
इराणचा दावा आहे की अमेरिका सौदी अरेबियाच्या भूमीचा वापर इराणवर हल्ल्यासाठी करत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
Pakistan Saudi Defense Pact : पाकिस्तानची मध्यस्थीची भूमिका
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी आपल्या इराणी समकक्ष अब्बास अराघची यांना सौदी अरेबियावर हल्ला करू नये, अशी विनंती केल्याचे सांगितले. इस्लामाबाद आणि रियाधदरम्यान झालेल्या संरक्षण कराराचा दाखला देत डार यांनी इराणला इशारा दिला की, एका देशावर हल्ला म्हणजे दोन्ही देशांवर हल्ला मानला जाईल.
दरम्यान, सौदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. पाकिस्तानने सौदी अरेबियाला पूर्ण पाठिंबा दर्शवला असून संघर्षाचा विस्तार होऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News





















