एक्स्प्लोर

Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी भाजपनंही चार नावांची घोषणा आज केली... यातलं रामदास आठवलेंचं नाव आधीच नक्की झालं होतं... अपेक्षेनुसार ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनाही पक्षानं संधी दिलीये... उरलेली दोन नावं मात्र काहीशी अपरिचित आहेत... आपल्या उमेदवार निवडीतून भाजपनं सोशल आणि जिओलॉजिकल बॅलन्स साधलाय... बघुयात हा स्पेशल रिपोर्ट...  
राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजपनं पुन्हा एकदा 'सोशल इंजिनिअरिंग' केलंय...   वाट्याला आलेल्या चार जागांवर पक्षानं एक दलित, एक धनगर, एक आदिवासी आणि एक मराठा उमेदवार दिलाय...   याशिवाय कोकण, मराठवाडा, विदर्भातून उमेदवारी देत प्रादेशिक समतोल राखण्याचाही प्रयत्न झाल्याचं दिसतंय...   केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे नेते असले, तरी पुन्हा एकदा भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जातील...  

मराठवाड्यातील धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते यांना पक्षानं संधी दिलीये...   राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना विधान परिषदेचे आमदार राहिलेले वडकुते...   २०१९ साली ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले...  २०२१मध्ये त्यांनी हिंगोलीचे भाजप जिल्हाध्यक्ष या नात्यानं निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली...   
नागपूरच्या माया ईवनाते या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करतात...   २००२ साली भाजप नगरसेवक, २००७ साली नागपूरच्या महापौर, २०१२ साली भाजप प्रदेश उपाध्यक्ष...   २०१७ मध्ये राष्ट्रीय आदिवासी आयोगाच्या सदस्य अशी त्यांची चढती कारकीर्द राहिलीये...   अलिकडेच झालेल्या महापालिका निवडणुकीत मायाताई प्रभाग १२मधून निवडून आल्यात...  
रामराव वडकुते आणि माया इवनाते ही नावं महाराष्ट्राला फारशी माहिती नसली, तरी...   भाजपचे चौथे उमेदवार मात्र संपूर्ण राज्याला परिचित आहेत...   GFX IN   भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिलीये...   अनेक वर्षं केलेल्या कामाला पक्षानं दिलेली ही पावती असल्याचं मानलं जातंय...   राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशित तयार झालेले तावडे...   गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई, महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाचं काम करतायत...   बिहारचे निवडणूक प्रभारी या नात्यानं 'अँटी इन्कम्बस्नी' मोडून काढत भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्याची किमया करून दाखवलीये...  

चार समाजांचे आणि राज्याच्या चार विभागांमधून उमेदवार देत भाजपनं सामाजिक आणि भौगोलिक समतोल अचूक साधलाय... 
मराठा, दलित, धनगर आणि आदिवासी या चार समाजांचा मिळून राज्याच्या लोकसंख्येत ५० ते ५५ टक्के वाटा आहे...   आगामी काळात निर्णायक ठरू शकणारी मतं आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा हा आणखी एक प्रयत्न... 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget